हिंगोलीत जन्मकल्याणक महामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:28 AM2018-04-09T00:28:48+5:302018-04-09T00:28:48+5:30
पंचकल्याणक महामहोत्सव अत्यंत महत्वाचा दिवस ‘जन्मकल्याणक महोत्सव’ तिर्थकर बालकाचा जन्मोत्सव व पांडुकशिलेवर जन्माभिषेक हर्षोल्हासात भाविकांच्या उपस्थित साजरा केला. दुपारी एक वाजता ८ वर्षावरील मुला-मुलींवर मुनीश्री अक्षयसागर महाराजद्वारा सुसंस्कार करून त्यांना पुढील मुद्यावर नियमावलीद्वारे शपथ दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंचकल्याणक महामहोत्सव अत्यंत महत्वाचा दिवस ‘जन्मकल्याणक महोत्सव’ तिर्थकर बालकाचा जन्मोत्सव व पांडुकशिलेवर जन्माभिषेक हर्षोल्हासात भाविकांच्या उपस्थित साजरा केला. दुपारी एक वाजता ८ वर्षावरील मुला-मुलींवर मुनीश्री अक्षयसागर महाराजद्वारा सुसंस्कार करून त्यांना पुढील मुद्यावर नियमावलीद्वारे शपथ दिली.
नियमित जिनेंद्र भगवंतांचे दर्शन घेणे, अभिषेक पूजन करणे, आजीवन मद्य, मांस, मधूचा त्याग करणे, आजीवन सप्तव्यसनाचा त्याग, लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन, दिगंबर जैन मुला-मुलींशी लग्न करेन, खरे देव गुरू शास्त्रांची आराधना करेन, आजीवन आई-वडिलांची सेवा, फास्ट फूड, मांस मिश्रित पदार्थ न खाणे, जेवताना टीव्ही पाहणार नाही, परिवाराचे, कुलाचे धर्माचे व देशाचे नाव बदनाम होईल असे कृत्य करणार नाही, अशी प्रतिज्ञा उपस्थित १०८ मुले ५२ मुली अशा एकूण १६० मुला-मुलींना व्रतोपदेश संस्कार विधी मुनीश्री अक्षयसागरजी महाराज, मुनीश्री नेमीसागरजी महाराज, क्षुलक समताभूषणजी महाराज यांच्या हस्ते बा.ब. विनयभैय्याजी व बा.ब. तात्याभैय्याजी सानिध्यात संपन्न झाला. यावेळी भारतीय संस्कृतीके सूत्रधार ऋषभदेव, प्रवचनाची ध्वनिफीत, विश्वधर्म की रुपरेषा, पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचा संस्कार समारंभ संपन्न झाला. जन्म व मृत्यूची सत्यता सांगून मृत्यूच्या भीतीबद्दल रामायण व महाभारतातील उदाहरणे दिली. जीवनाचे लक्ष निश्चित करा. कुलदीपक विश्वदीपक झाला पाहिजे असे मुनीश्रीनी सांगितले. . पाश्चात्यसंस्कृती सोडून भारतीय संस्कृतीचे आचारण करा, शाश्वत सुख प्राप्त करा, माता-पिता संस्कारित असेल तर मुलगा संस्कारित होतो. आयुष्य वाया घालू नका, देवदर्शन करा, धर्म पाळा, धार्मिक बना, रात्र झोपण्यात व दिवस खाण्यात घालू नका, मूल्यवान आयुष्याचा वापर चांगला करा.