हिंगोलीत काळ्या फिती बांधून लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:21 AM2018-11-06T00:21:21+5:302018-11-06T00:21:48+5:30
शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
गारमाळ येथे मंडळाधिकारी अल्लाबक्ष हे रास्तभाव दुकानाच्या चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाºया दोषींविरूद्ध तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेतर्फे केली आहे. सदर घटनेचा निषेध करीत तलाठी संघातर्फे काळ्याफिती लावून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदन दिले. सात दिवसांमध्ये संबधित आरोपीस अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष स. अब्दुल स. हैदर, गजानन रणखांब, प्रदीप इंगोले, अशोक केंद्रेकर, हर्षवर्धन गवई, खंदारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.