हिंगोलीत १ लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:17 AM2018-06-04T00:17:29+5:302018-06-04T00:17:29+5:30
शहरातील गाडीपूरा भागातील एका गोदामावर शहर पोलिसांनी ३ जून रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. गोदामातील १ लाख १० हजारांचा विविध कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील गाडीपूरा भागातील एका गोदामावर शहर पोलिसांनी ३ जून रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. गोदामातील १ लाख १० हजारांचा विविध कंपनीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
हिंगोली शहरातील गोदामात गुटखा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोनि उदसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शहरातील गाडीपूरा भागातील आनंद अग्रवाल यांच्या गोदामावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी विमल, हॉट ,सुगंधी तंबाखू, राजविलास कंपनीचा १ लाख १० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोनि उदयसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानेश्वर मुलगीर, शेख शकील, शेख, जीवन मस्के, शेख मुजीब, उमेश जाधव, सुनील जैस्वाल आदींनी केली. हिंगोली शहरात सर्रासपणे छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. शिवाय अवैध धंदेही फोफावले आहेत. वसमत शहर येथून बदली होऊन हिंगोली येथे रूजू झालेले पोनि उदयसिंग चंदेल यांनी अवैध धंद्याविरोधात मागील दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.