हिंगोलीत राष्ट्रीय ‘एकता दौड’ व संकल्प दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:27 PM2018-10-31T14:27:41+5:302018-10-31T14:28:39+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला.
हिंगोली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला.
एकता दिनानिमित्त अग्रसेन चौक - बसस्थानक - इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी चौकपर्यंत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकता दौड रॅलीस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिरवा झेंडा दाखवताच सुरुवात झाली.
तसेच यावेळी राष्ट्रीय एकतेची सर्वाना शपथ देण्यात आली. यावेळी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख जाधवर, नायब तहसीलदार, जिल्हा क्रिडा अधिकारी पाठक, गळगे आदींची उपस्थिती होती. एकता दौडमध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशाला, माणिक स्मारक विद्यालय, सरजूदेवी विद्यालय, सिक्रेट हार्ट हायस्कूल या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी नागरिकांनी, खेळाडु, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे सहभागी झाले होते.