हिंगोली शहर पोलीस ठाणे बनले गोशाला; अनेकांनी सांभाळ करण्याचे दिले केवळ तोंडी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:50 PM2018-03-30T19:50:06+5:302018-03-30T19:50:06+5:30

कोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.  

Hingoli city police station became Ghancha; Only oral assurance given to many people to handle | हिंगोली शहर पोलीस ठाणे बनले गोशाला; अनेकांनी सांभाळ करण्याचे दिले केवळ तोंडी आश्वासन

हिंगोली शहर पोलीस ठाणे बनले गोशाला; अनेकांनी सांभाळ करण्याचे दिले केवळ तोंडी आश्वासन

Next

हिंगोली : अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.  

गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कत्तलीकडे घेऊन जाणाऱ्या गुरांवर अनेक जण डोळा ठेवून आहेत. एखांद्या रस्त्याने जर गुरे घेऊन जाणारा ट्रक आढळला तर त्यांची माहिती थेट पोलिसांना दिली जाते.  असलाच एक अनुभव २३ मार्च रोजी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या गुरांच्या माध्यमातून आला आहे. या प्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच आहे.  हे प्रकरण जरी कोर्टात गेले असले तरीही या गुरांना सांभाळायचा प्रश्न पोलिसांसमोर आ वासून आहे. या ठिकाणी गुरे सोडून घेण्यासाठी तर कोणी अद्याप आले नाही. मात्र पकडेल्या गुरांना चारा दाखवून फोटो काढणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील  दोन तीन वगळता सर्वच गुरांना मार लागलेला असल्याने यांना सांभाळायचेही कोणी धाडसच करीत नसल्याचे चित्र आहे. तीन गुरांच्या जखम चीघळ्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत. 

या ठिकाणी पोलीस कर्मचारी एका महिलेला देखरेखीसाठी ठेवलेले असले तरीही येता- जाताना कर्मचारी गुरांची पाहणी करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासापेक्षा गुरांचा संभाळा पोलिसांना चांगलाच अवजड होऊन बसला आहे. गुरांच्या सांभाळासाठी जि. प. पशुसंवर्धन विभाग, नगर पालिका, वळूमाता पैदास केंद्र, जिल्हा कृषी विभाग आदी विभागाचे दारे ठोठावूनही काहीच प्रतीसाद मिळालेला नाही. एखांद्या धन्या सारखे या गुरांचा सांभाळ करण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

अनेकांकडून तोंडी मागणी 
अनेकांकडून गुरांची तोंडी मागणी होत असली तरीही गुरांमधून काही फायदा नसल्याने की काय? एकाही राजकीय पुढाऱ्यांने साधे पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुरांची माहितीही विचारली नाही. तर १२ जानेवारी रोजी पकडलेली १७ गुरे हत्ता येथील गोशाळेत आहेत. ती गुरे परत घेण्यासाठी त्या गुरांच्या मालकाने पोलिसांकडे अर्ज केला त्यामुळे न्यायालयाने गुरे वापस करण्याचा आदेश दिला आहे. मात्र गोशाळा चालक तो पाळत नसून ३०० रुपये प्रमाणे गुरांचा खर्च मागत आहे. तर गुरांचा मालक ५० रुपये प्रमाणे खर्च देण्यास तयार असला तरी ते देण्यास तयार नाहीत.

उत्तराची प्रतीक्षा 
पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरांच्या साभांळासाठी पत्राद्वारे विविध विभागाकडे मागणी केली आहे. त्या विभागाकडून मिळणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा लागली आहे. काही विभागाने तर दुसऱ्या विभागाची दारे दाखवलेली आहेत. 

सांभाळण्यास गुरे घ्या गुरे म्हणण्याची आली वेळ
कत्तलीकडे घेऊन जाणाऱ्यां गुरांचा प्राण वाचविण्यात पोलिंसाना यश आले असले तरीही त्यांचा सांभाळ करणे आता चांगलेच अवघड होऊन बसले आहे. या ठिकाणी फोटो काढून घेणाऱ्यांची संख्या जास्त असली तरीही यांचा सांभाळ करतो असे म्हणणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे गुरे सांभाळण्याची व्यवस्था असणाऱ्या विभागासह गोशाळेकडे धाव घेऊन सांभाळण्यास गुरे घ्या घ्या गुरे असे म्हणण्याची वेळ पोलीसांवर येऊन ठेपल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले व पो. कॉ. प्रदीप जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर अनेकजण येथे मदतीसाठी धावत आहेत

Web Title: Hingoli city police station became Ghancha; Only oral assurance given to many people to handle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.