अस्वच्छतेकडून हिंगोली शहर धावतेय निर्मळतेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:09 AM2017-12-21T00:09:40+5:302017-12-21T00:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : एकेकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला होता. मोडक्या-तोडक्या कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यात फिरणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकेकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला होता. मोडक्या-तोडक्या कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यात फिरणारी गुरे अन् अवघा परिसरच दुर्गंधीमय असे चित्र अनेक भागात दिसत होते. मात्र हे चित्र बदलू लागले आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या आल्या आहेत. तर काही ठिकाणी घंटागाडीच कचरा नेण्यासाठी अवतरत आहे. या गाडीच्या घंटीचा नाद ऐकताच नागरिक कामे सोडून कचरा नेवून देताना दिसत आहेत.
पालिकेने रात्रंदिवस शहर स्वच्छतेचे स्वप्न पाहिले होते आणि ते नागरिकांच्या सहकार्याने प्रत्यक्षातही उतरले आहे. यासाठी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने, पालिकेने स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टप्प्यात बक्षीस जाहीर केले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ हा केंद्र शासनाचा उपक्रम असून यात हिंगोलीचा समावेश आहे. त्यामुळे आपापल्या वॉर्डातील नगरसेवकांनी स्वच्छतेची जबाबदारी उचलली असून, स्वखर्चाने रस्ते नाल्या व कुंड्या बसविण्यास सुरूवात केली आहे. तर बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करुन घेण्यावर भर देत आहेत. तर पालिकेने रुग्णालय स्वच्छता, शाळा, व्यापारक्षेत्र, सोसायटी, हॉटेल येथे विविध स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. तर पालिकेने तयार केलेल्या स्वच्छता अॅपवरही आलेल्या तक्रारीचे निराकरण वेळीच केल्या जात आहे. तसेच काही संस्था व बँकाही या उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. हाच उत्साह राहिल्यास लवकरच स्वच्छ शहराचे स्वप्न साकारणे शक्य आहे.
स्वच्छतेवर भर : घंटागाडीच्या आवाजाकडे लक्ष
शहरातील स्वच्छतेचे कंत्राट दिल्याने शहरभर फिरणाºया पालिकेच्या घंटागाडीच्या आवाजावर लक्ष केंद्रित केले जात आहे. एवढेच काय तर शहरातील नागरिक केरकचरा रस्त्यावर आणून वाहनाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे आपसूकच शहरात स्वच्छता दिसत आहे. तसेच नेहमीच रस्त्यावर कचरा पसरणाºया ठिकाणी कचरा पेट्या ठेवल्या जात आहेत. त्यामुळे त्या भागातीलही नागरिकांना कचरापेटीत कचरा टाकण्याची सवय झाली आहे. हीच सवय काम राहावी जेणेकरुन स्वच्छ व सुंदर शहर राहण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.