हिंगोली शहरात रात्री अर्धा तास धुवाँधार
By Admin | Published: June 29, 2016 12:10 AM2016-06-29T00:10:20+5:302016-06-29T00:10:20+5:30
हिंगोली शहर व परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जोरदार पाऊस पडला
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 29 - हिंगोली शहर व परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जोरदार पाऊस पडला. रात्री १०.५० च्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल अर्धा तास बरसला. पहिल्यांदाच रस्त्यावर पाणीच पाणी दिसून आले.
हिंगोली शहर व परिसरात धुवाँधार पावसामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले होते. बस स्थानक परिसर, जिजामातानगर, लाला लजपतरायनगर, सिद्धार्थ कॉलनीसह शहरालगतच्या बळसोंड, अंधारवाडीत पाणीच पाणी झाले. रात्री साडेअकरापासून रात्री उशिरापर्यंत रिमझिम होती. जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यावर वरुणराजा मेहरबान राहिला असून, दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. आखाडा बाळापूर परिसरात रात्रीतून १२७ मिमी पावसाची नोंद झाली होती. दुसरीकडे औंढा नागनाथ तालुक्यात मात्र सतत दुसऱ्या वर्षी वरुणराजाची अवकृपा सुरूच आहे. आजपर्यंत या तालुक्यात अवघा ५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.