हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:14 AM2019-02-19T01:14:34+5:302019-02-19T01:14:49+5:30

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

 Hingoli city's traffic problem became serious | हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.
हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमच गंभीर असतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी तर चांगलेच वाभाडे निघाले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवस सुधारणेचे वारे वाहू लागले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनावर घेत असल्याचे दाखवून एका दिवसापुरते या प्रश्नाकडे पाहतात. पुन्हा त्यांनी पाठ फिरविली की, खालची मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहे. या विभागाला कधीच पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. पोलीस निरीक्षक सुडके यांच्या रुपाने काही काळ पूर्णवेळ अधिकारी मिळाला होता. आता सुडके यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब मान्य. मात्र हिंगोली शहरात आता पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करून वाहतूक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र ही बाब मनावर घेणारा अधिकारी हिंगोलीत येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title:  Hingoli city's traffic problem became serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.