हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने पंधरा दिवसांत ७५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:41+5:302021-05-18T04:30:41+5:30

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १४ हजार ८३३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार ९७८ रुग्ण बरे झाले ...

In Hingoli district, 75 died in 15 days due to corona | हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने पंधरा दिवसांत ७५ मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने पंधरा दिवसांत ७५ मृत्यू

Next

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १४ हजार ८३३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार ९७८ रुग्ण बरे झाले आहेत. १ ते १५ मे या काळात १ हजार ९९० नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात एकूण ५४२ रुग्ण सक्रिय आहेत. एकीकडे रिकव्हरी रेट ९४ टक्के असला, तरी मागील पंधरा दिवसांत ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युदरचा आकडा २ टक्क्यांवर आला आहे. आरोग्य विभागाने कोरोनाला आळा घालण्यासाठी टेस्टिंग वाढविल्या असून, लसीकरणावर भर दिला आहे, तसेच जिल्ह्यात १८ कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यात १ हजार ८३४ साधे बेड तर ८०७ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी १३ केएलचे ३ व १० केएलचे १ असे चार ऑक्सिजन टँक उपलब्ध केले आहेत.

Web Title: In Hingoli district, 75 died in 15 days due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.