हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:31 AM2018-01-11T00:31:13+5:302018-01-11T00:32:27+5:30

शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Hingoli district administration demanded Rs 36.60 crore for the cotton damages | हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

Next
ठळक मुद्देकळमनुरी, औंढ्याचा अहवालच नाही : जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही ढिम्म गती

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती येण्याचे नाव दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने ३६.६0 कोटींच्या मदतीची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ५४ हजार ६00 हेक्टर एवढे आहे. बोंडअळीग्रस्तांना कृषी विभागाकडे अर्ज करण्यास सांगितल्यानंतर अनेक शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या. मात्र बोंडअळीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा आदेश दिला होता. ७ डिसेंबरच्या दरम्यान जिल्हाधिकाºयांनीही यासंदर्भात सर्व गावांत तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करण्यास आदेशित केले. त्याला महिना उलटला आहे. एकमेव वसमत तालुक्यात २२ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र तर उर्वरित क्षेत्र इतर चार तालुक्यांत होते. त्यामुळे वसमत वगळता इतर तालुक्यांतील सर्व्हेक्षणाचे काम वेळेत अंतिम होणे गरजेचे होते. परंतु यात वसमतचा अंतिम अहवाल आला असताना कळमनुरी व औंढा तालुक्यांतील अहवाल अंतिम नाहीत. नुकतीच कृषी विभागाने बैठक घेऊन या दोन्ही तालुक्यांचे अंतिम अहवाल देण्यास बजावलेले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला अहवाल दिला असून यात ८५ हजार ७२३ श शेतकºयांना ५३९७५ हेक्टर क्षेत्रासाठी ३६.६0 कोटींची मागणी केल्याचे सांगितले जाते.

असे आहे बाधित क्षेत्र
कृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार वसमत तालुक्यात २६ हजार ६९0 शेतकऱ्यांचे २१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सेनगाव तालुक्यात ४२२१ शेतकºयांचे २४७२ हेक्टर तर हिंगोली तालुक्यात ३८५0 शेतकºयांचे २९५0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर प्राथमिक अहवालानुसार कळमनुरीत ९ हजार शेतक-यांचे ६८00 हेक्टर तर औंढा तालुक्यातील ९0३३ शेतक-यांचे ६५१0 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत या तालुक्यांनीही अंतिम अहवाल द्यावा, असे जिल्हाधिका-यांनी बजावलेले आहे.

Web Title: Hingoli district administration demanded Rs 36.60 crore for the cotton damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.