हिंगोली जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या पूर्ण; सततच्या पावसाने काही भागात पेरणी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 07:04 PM2018-07-26T19:04:12+5:302018-07-26T19:04:43+5:30

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

Hingoli district completes 84% ​​sowing; There is no sowing in some areas due to continuous rains | हिंगोली जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या पूर्ण; सततच्या पावसाने काही भागात पेरणी नाही 

हिंगोली जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या पूर्ण; सततच्या पावसाने काही भागात पेरणी नाही 

googlenewsNext

हिंगोली : यंदा जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय मध्यंतरीचे दहा ते बारा दिवस वगळले तर पावसात सातत्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अतिवृष्टीचाही फटका बसला. यंदा आतापर्यंत ४९.३१ टक्के पर्जन्यमान झाले असून गतवर्षी अवघे ३0.५१ टक्के झाले होते. मागील चोवीस तासांत आज सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार हिंगोली-१0, वसमत-३.७१, कळमनुरी-१0.६७, औंढा -७.२५, सेनगाव ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामात आजपर्यंत तालुकानिहाय पर्जन्य  हिंगोली-४५८.३८, वसमत-४३२.११, कळमनुरी-४८२.५१, औंढा -४२४.७५, सेनगाव ४0३.३२ मिमी असे आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४0 हजार ६२७ हेक्टर असून ५ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. बाजरीची ४४ हेक्टर, खरीप मक्का ९४६ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीचे क्षेत्र वाढले असून ३८ हजार ६३६ हेक्टर, मूग ६९२५ हेक्टर, उडीद ५0१४ हेक्टर, इतर कडधान्य ७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीळ १९५ हेक्टर, कारळ १२0 हेक्टर, सोयाबीन २ लाख २३ हजार ९४ हेक्टरवर पेरले गेले आहे. यात वाढ झाली. तर कापसाचे क्षेत्र ८२ हजारांवरून ४२ हजार ६११ हेक्टरवर आले आहे. इतर पिके ११0६ हेक्टरवर आहेत. जिल्ह्याच्या ३.८४ लाख एवढ्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३.२४ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण ८४.३९टक्के आहे. तालुकानिहाय विचार केला तर कळमनुरी व हिंगोली तालुक्यात १00 टक्क्यांवर पेरणी झाली. वसमत-७४, औंढा ७६ तर सेनगावात ७२ टक्के पेरणी झाली.

आठ तलाव भरले
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असली तरीही केवळ ८ तलावच १00 टक्के भरले आहेत. तर ७ २५ टक्क्यांच्या आत आहेत. १ पन्नास टक्क्यांपर्यंत भरला. दोन तलाव ७५ टक्क्यांपर्यंत भरले. तर ४ त्यापेक्षा जास्त भरले आहेत.  या सर्व प्रकल्पांत २७ दलघमी पाणी असून ५१.८३ टक्के जलसाठा झाला.

Web Title: Hingoli district completes 84% ​​sowing; There is no sowing in some areas due to continuous rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.