हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:38 PM2018-03-23T23:38:34+5:302018-03-23T23:38:34+5:30

क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Hingoli district discovered 993 tuberculosis during the year | हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात ९९३ क्षयरूग्णांचा शोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भारतात दिवसेंदिवस क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातून टीबी हद्दपार करण्यासाठी २०२५ हे टार्गेट ठेवले आहे. परंतु खासगी रुग्णालयात टीबीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांबाबत सरकारकडे माहिती नाही. त्यामुळे सरकारने टीबी रुग्णांची माहिती देणाºया खासगी डॉक्टरांना ५०० रूपये तर फार्मासिस्टना १००० रुपय मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. क्षयरोगबाधित रुग्ण पूर्णपणे उपचार घेत नाहीत, त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. जे की, रूग्णांना डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.राहूल गिते, प्रशांत तुपकरी यांनी केले आहे.
जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ५ टिबी युनिट कार्यरत असून २९ आरोग्य संस्थेमार्फत कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयरोग निदानासाठी १५ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत. शासकीय आरोग्य संस्था, खासगी-व्यावसायीक, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत रूग्णांना औषधोपचार दिला जात आहे. क्षयरोगाच्या अचूक व त्वरित निदानासाठी जिल्हा क्षयरोग्य केंद्र येथे जिन एक्सपर्ट सुविधेद्वारे १००३ चाचण्या केल्या. त्यापैकी २०३ रूग्ण शोधले असून १८ एमडीआर रूग्णांचा यात समावेश आहे. वर्षभरात ९९३ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ताप, भूक मंदावणे, छातीत दुखणे असे लक्षणे दिसल्यास क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी.
क्षयरोगाचे जंतू मुख्यत: हवेतून पसरतात. फुुफुसाचा क्षयरोग झालेली रूग्ण ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू शरीरात प्रवेश करतात. जंतू सूक्ष्म थेंबाद्वारे हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो, तेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग होऊन जंतूसंसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत असतात. अशा संसर्गित व्यक्तीला बाधा होण्याची आयुष्यात १० टक्के शक्यता असते.

Web Title: Hingoli district discovered 993 tuberculosis during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.