हिंगोली जिल्ह्यातील ‘एचआयव्ही’चे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:40 PM2017-11-30T23:40:31+5:302017-11-30T23:40:36+5:30
एड्स रोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. गतवर्षीपेक्षा यंदा एचआयव्हीचे प्रमाणात घट झाली आहे. २००२ ते २०१७ आॅक्टोबरअखेर हिंगोली जिल्ह्यात एचआयव्हीसह जीवन जगणाºयांची संख्या ३ हजार ७६७ एवढी आहे. तर आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली असून ४ लाख ४५ हजार १२१ जणांना एडस् आजाराबद्दल समुपदेशन व माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एड्स रोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. गतवर्षीपेक्षा यंदा एचआयव्हीचे प्रमाणात घट झाली आहे. २००२ ते २०१७ आॅक्टोबरअखेर हिंगोली जिल्ह्यात एचआयव्हीसह जीवन जगणाºयांची संख्या ३ हजार ७६७ एवढी आहे. तर आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली असून ४ लाख ४५ हजार १२१ जणांना एडस् आजाराबद्दल समुपदेशन व माहिती देण्यात आली.
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालय हिंगोली यांच्यामार्फत जिल्हाभरात एडस् आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविली जाते. शहरासह ग्रामीण भागात जाऊन सुरक्षित लैंगिक संबधाविषयी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयीन नवतरूणांमध्ये एडस् आजाराविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. शिवाय मार्गदर्शन केले जात आहे. एड्स दिनानिमित्त जिल्ह्यातील १६ महाविद्यालयात व्याख्यान व पोस्टर प्रदर्शनी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात डापकूची टीम विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करीत असून अतिजोखमीच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे एचआयव्ही प्रतिबंध मार्गदर्शन करेल.