हिंगोली जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By विजय पाटील | Published: April 8, 2023 05:14 PM2023-04-08T17:14:29+5:302023-04-08T17:14:48+5:30
शेतात हळद काढणीचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली.
हिंगोली: अवकाळी पावसाने जिल्ह्यास पुन्हा तडाखा दिला आहे. शेतात काढणीचे काम सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे हळद काढत असताना वीज कोसळून पीराजी विठ्ठल चव्हाण ( २५ ) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
शेतात हळद काढणीचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. दुपारी वादळवाऱ्यासह वीजाच्या कडकडाटात पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मागील महिन्यात देखील अवकाळीचा फटका पिकांना बसला होता. आज नर्सी नामदेव, कडोळी, जवळा पांचाळ, केंद्रा बु येथे पाऊस झाला. यावेळी हळद उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
तसेच कळमनुरीत, कुरुंदा येथे रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे शेतामध्ये हळद काढणी सुरु होती. यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. वीज कोसळून पीराजी विठ्ठल चव्हाण या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.