हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:50 AM2018-08-06T00:50:12+5:302018-08-06T00:51:41+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे याची दखल आयुक्त संजीव कुमार यांनी घेतल्याने इमारतीच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत. अहवाल घेऊन शल्यचिकित्सक व सा.बां विभागाच्या अभियंत्यास मुंबई येथे येण्याच्या सूचनाही उपसंचालकांनी दिल्या आहेत.

Hingoli District Hospital building sought report | हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल

हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल

Next
ठळक मुद्देसोमवारी होणार मंत्रालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे याची दखल आयुक्त संजीव कुमार यांनी घेतल्याने इमारतीच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत. अहवाल घेऊन शल्यचिकित्सक व सा.बां विभागाच्या अभियंत्यास मुंबई येथे येण्याच्या सूचनाही उपसंचालकांनी दिल्या आहेत.
जिल्हासामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रुग्णालयास भेट देऊन केलेल्या पाहणीत खरोखरच रुग्णालयाचे काम अर्धवट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित कंत्राट दारास थेट पोलीसाच्या हवाली केले होते. कंत्राट दारांनी शहर पोलीस ठाण्यात काम पुर्ण करुन देण्याची मुदत लिहून दिल्यानंतर कुठे सुटका झाली होती. मात्र अजूनही इमारतीचे भिजत घोंगडे आहे. त्यातच १५ जुलै रोजी आरोग्य उपसंचालक संजीव कुमार यांनी रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाचा संपूर्ण आढावा घेतला होता. त्यातही इमारत अपुर्ण असल्याचेच उघड झाले. त्यामुळे आरोग्य उपसंचालकांनी रुग्णालयाच्या इमारतीची दखल घेऊन ४ आॅगस्ट रोजी शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांच्या सोबत संपर्क साधून इमारतीची सध्याची स्थिती फोटोसह मागविली. त्यानुसार शल्यचिकित्सक श्रीवास यांनी ५ आॅगस्ट रोजी इमारतीची पाहणी करुन पुर्ण व अपूर्ण कामाचे फोटो काढून घेण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये पहिल्या माळ्याचे काम पूर्ण झालेले असले तरीही त्या ठिकाणी बरेच काम बाकी आहे. तर दुसऱ्या माळ्याचे तर मोठ्या प्रमाणात काम बाकी आहे. त्यामुळे पहिल्या माळ्यावर तळमजल्यावरील काही वार्ड स्थलांतरित करण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत होणार असल्याचे शल्यचिकित्सकांनी सांगितले. आता उपसंचालकांनीच लक्ष घातल्याने कामा बांधकाम विभागाही खडबडून जागे झाला आहे.
---
गैरसोय टळेल : २०० बेडचे रुग्णालय होणार
आता रुग्णालयाची दखल मंत्रालय स्तरावर घेतली असल्याने रुग्णालय २०० बेडचे लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसोयीतून रुग्णांची गैरसोय कायमची कमी होण्यास मदत मिळणार आहे. मात्र पहिल्या मजल्यावर विद्युत पुरवठा नसल्यानेच अडचणी येत असल्याचे रुग्णालयातर्फे सांगितले जात आहे. आता मात्र रुग्णालयाचा संपुर्ण पाढाच आरोग्य उपसंचालकासमोर शल्यचिकित्सक श्रीवास हे वाचणार आहेत. त्यामुळे संथगतीने होत असलेल्या कामाचे मात्र आता बिंग फुटणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Hingoli District Hospital building sought report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.