हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:06 PM2018-08-30T23:06:31+5:302018-08-30T23:06:50+5:30

निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

 Hingoli district increased 30 polling stations | हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
पुढच्या वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नवीन मतदार नोंदणी व पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदारांना सुकर व्हावे, यासाठी योग्य मतदारसंख्या निश्चित करण्यासाठी ही विभागणी केली. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात १४00 मतदारांमागे एक तर शहरी भागात १२00 मागे एक मतदान केंद्र देण्यात आले आहे. यापूर्वी काही मतदान केंद्रांवर तर सतराशेपेक्षाही जास्त मतदार झाल्याने मतदारांची अडचण होत होती. अशा ठिकाणी आता सुरळीतपणा येणार आहे.
या नव्या निर्णयात हिंगोली विधानसभेअंतर्गत १३, वसमतअंतर्गत ८ तर कळमनुरीअंतर्गत ९ मतदान केंद्र वाढले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २२ तर शहरी भागातील ८ मतदान केंद्र वाढले आहेत. याबाबतच्या सर्वेक्षणानंतर प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली असल्याने आता वाढीव मतदान केंद्रांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
पुनरिक्षण कार्यक्रम
आता पुढील निवडणुकीपूर्वीचा बहुदा अंतिम मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पात्र नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारणे, ३0 नोव्हेंबरपूर्वी हे दावे निकाली काढणे, डाटाबेसचे अद्ययावतीकरण करून पुरवणी याद्या ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करणे, ४ जानेवारीला अंतिम प्रसिद्धी देणे असा हा कार्यक्रम आहे.
वसमत विधानसभा मतदार संघात आता ३२२ मतदान केंद्र राहणार असून २.८0 लाख मतदार आहेत. यात १.४६ लाख पुरुष तर १.३४ लाख स्त्री मतदार आहेत. कळमनुरी मतदारसंघात आता ३४५ मतदान केंद्र झाले असून मतदारसंख्या २.९४ लाख झाली. यात १.५५ लाख पुरुष तर १.३९ लाख स्त्री मतदारांचा समावेश आहे. हिंगोलीत ३३४ मतदान केंद्र राहणार असून २.९९ लाख मतदार आहेत. यात १.५७ लाख स्त्री तर १.४२ हजार पुरुष मतदार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीकर यांनी दिली.

Web Title:  Hingoli district increased 30 polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.