हिंगोली जिल्ह्यात १९.८९ मिमी पावसाची नोंद; शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 01:09 PM2020-06-12T13:09:38+5:302020-06-12T13:15:02+5:30

जिल्ह्यात मागील आठवड्यातील पावसानंतर सलग दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घेतली आहेत.

Hingoli district receives 19.89 mm of rainfall; Farmers almost started sowing | हिंगोली जिल्ह्यात १९.८९ मिमी पावसाची नोंद; शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु

हिंगोली जिल्ह्यात १९.८९ मिमी पावसाची नोंद; शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु

Next
ठळक मुद्दे विविध भागात सोयाबीन, उडीद, मुगाची पेरणी सुरू आहे. काही भागात कापसाची लागवड केली जात असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात कालपासून आज पहाटे सहा वाजेपर्यंत १९.८९ मिमी पावसाची नोंद झाली असून सेनगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे काही भागात पेरणीच्या कामांना प्रारंभ झाल्याचे चित्र दिसून येत होते.

काल रात्री विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्यात तालुकानिहाय झालेल्या सरासरी पावसात हिंगोली १८ मिमी, कळमनुरी-१३, सेनगाव ४५, वसमत ८.४३, औंढा १५ मिमी अशी नोंद झाली आहे. जिल्ह्याची यंदाच्या पावसाळ्यातील एकूण पावसाची सरासरी आता ५७.७७ मिमीवर गेली आहे. वार्षिक सरासरीच्या ९.0३ टक्के पर्जन्यमान झाले आहे. यात हिंगोली ५२.८८६ मिमी, कळमनुरी ५९.३३, सेनगाव २३.१६, वसमत ७५, औंढा नागनाथ ७८.५0 मिमी अशी नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची सरासरी अवघी १५.३८ मिमी होती. 

मंडळनिहाय पडलेला पाऊस

हिंगोली तालुक्यात हिंगोली १३ मिमी, खंबाळा १४, माळहिवरा २१, सिरसम बु.२८, बासंबा १८, नर्सी नामदेव १९, डिग्रस १३, कळमनुरी तालुक्यात कळमनुरी १९, नांदापूर १, आखाडा बाळापूर ३0, डोंगरकडा २२, वारंगा फाटा ४, वाकोडी २, सेनगाव तालुक्यातील सेनगाव ४0, गोरेगाव २0, आजेगाव ६२, साखरा ७५, पानकनेरगाव ६५, हत्ता ८, वसमत तालुक्यातील वसमत ५, हट्टा ६, गिरगाव ७, कुरुंदा ५, टेंभूर्णी १६, आंबा १२, हयातनगर ८, औंढा तालुक्यातील औंढा १८, जवळा बाजार १५, येहळेगाव सो.१५, साळणा १२ मिमी अशी मंडळनिहाय नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १९.८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पेरण्यांना प्रारंभ
हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यातील पावसानंतर सलग दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घेतली आहेत. विविध भागात सोयाबीन, उडीद, मुगाची पेरणी सुरू आहे. काही भागात कापसाची लागवड केली जात असल्याचे दिसून येत आहे. काल तर हळदीच्या लागवडीची लगबग सगळीकडेच दिसून येत होती. कालच्या पेरणीनंतर आज विविध भागात झालेल्या पावसामुळे ही पेरणी साधली आहे. आज पुन्हा उर्वरित भागात पेरण्या सुरू झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Hingoli district receives 19.89 mm of rainfall; Farmers almost started sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.