हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; सकाळपर्यंत ३७ मिलीमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:20 PM2018-08-16T12:20:56+5:302018-08-16T12:23:38+5:30
आज सकाळ आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली : जिल्ह्यात विविध भागात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळ आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काल रात्री आणि आज सकाळ झालेल्या पावसाने विविध भागात नदी नाल्यांना साधारण पूर आले आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंत ही परिस्थिती कायम होती. संपूर्ण वातावरण गर्द ढगाळ असल्याने पावसाचा जोर आज असाच कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. श्रावण महिन्यात यंदा हा मोठा पाऊस होत आहे. पावसामुळे काही भागात काल रात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत झालेल्या नाही. जिल्ह्यातील काही भागात मुख्य वाहिनीवर बिघाड असल्याने वीजपुरवठा खंडित असल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये हिंगोली ३१ , वसमत ३१ , सेनगाव ३६, कळमनुरी ३३, तर औंढा नागनाथ तालुक्यात तब्बल ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे