कोरोना व्हॅक्सिनचा पुरेपूर डोस घेणारा हिंगोली जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:17+5:302021-01-20T04:30:17+5:30
हिंगोली : राज्यात कोरोना व्हॅक्सिनचा डोस देणे सुरू आहे. राज्याच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली व ...
हिंगोली : राज्यात कोरोना व्हॅक्सिनचा डोस देणे सुरू आहे. राज्याच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अशा एकूण २०० जणांना कोरोनाची लस देण्यात आली.
कोरोना व्हॅक्सिनची लस येणार येणार म्हणून सर्वांनाच उत्सुकता लागली होती. १६ जानेवारी रोजी उत्साहाच्या वातावरणात एकूण २०० डॉक्टर, आरोग्य सेवक, अधिपरिचारक आदींना कोरोना व्हॅक्सिनची लस देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यासाठी ६ हजार ६५० लसीचे डोस मिळाले होते. विशेष कौतुकाची बाब म्हणजे कोरोना व्हॅक्सिनचा एकही थेंब वाया गेला नाही, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले, हा लस देण्याचा कार्यक्रम महिनाभर चालणार आहे. पहिल्याच दिवशी १०० टक्के लसीकरण करणारा हिंगोली हा महाष्ट्रातील एकमेव जिल्हा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोविड ॲपमधून ऑनलाईन प्रमाणपत्र
६,६५० डोस मिळाले जिल्ह्याला
एकही डोस वाया गेला नाही
पहिल्या दिवशी दिला २०० जणांना डोस
नोंदणी केलेले कर्मचारी उपस्थित
दहा व्यक्तींना पुरेल एवढा डोस
कोरोना व्हॅक्सिनच्या एका बाटलीत १० व्यक्तींना पुरेल एवढा डोस असतो. अर्धा एमएल (.५) अर्धा एमएल प्रती व्यक्तींना लागणारा डोस आहे. नोंदणी केलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी १६ जानेवारी रोजी स्वयंस्फूर्तीने डोस घेतला.
१६ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालय १०० व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांनी डोस घेतला. हा कार्यक्रम महिनाभर चालणार असल्यामुळे सर्वानी न घाबरता ही लस घ्यावी व कोरोनापासून मुक्त व्हावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
सामान्य ताप, अंग दुखणे हे सामान्य लक्षण आहे. अशा प्रकाराला घाबरण्याचे कारण नाही. तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी केले आहे.