हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के पर्जन्यामानाची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:09 PM2020-09-16T19:09:39+5:302020-09-16T19:16:09+5:30

यंदा चांगल्या पर्जन्यामुळे इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर ही मोठी धरणेही भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.

Hingoli district recorded 100% rainfall for the second year in a row | हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के पर्जन्यामानाची नोंद 

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के पर्जन्यामानाची नोंद 

Next
ठळक मुद्देसात वर्षात दोनदा सहन केला तीव्र दुष्काळयंदा धरणेही ओसंडून वाहताहेतसात वर्षांत तिसऱ्यांदा १00 टक्के पर्जन्यमान

हिंगोली : मागील सहा वर्षांत पावसाच्या चढउताराचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागला. २१0४ व १५ असे सलग दोन वर्षे दुष्काळ भोगल्यावर २0१६ साली १0४ टक्के पर्जन्यमान झाले. पुन्हा दोन वर्षे अपुरा पाऊस पडल्यानंतर २0१९ मध्ये १0१ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा सलग दुसऱ्या वर्षी १00 टक्के पर्जन्यमान झाले आहे.

हवामान खात्याने अंदाज वर्तविला तरीही कधी पाऊस पडेल व कधी पडणार नाही, याची काही नेम नाही. मागील सहा वर्षांत तर शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाचे चटके सोसावे लागले. २0१४ साली जिल्ह्यात अवघे ५२.२२ टक्के पर्जन्यमान झाले होते. २0१५ मध्ये त्यात थोडी वाढ झाली. मात्र पर्जन्याचे मीटर ६४.२५ टक्क्यांच्या पुढे सरकले नाही. सलग दोन वर्षे दुष्काळ सोसल्यावर २0१६ साली मात्र वरूण राजाची कृपादृष्टी झाली. या वर्षी १0४.९३ टक्के पर्जन्यमान झाले. 

२0१७ मध्ये मात्र पुन्हा पावसाने धोका दिला. यावर्षीच्या पर्जन्याची नोंद ७३.१८ टक्के एवढी झाली. मात्र आधीच्या वर्षी झालेल्या पावसाने दुष्काळाची तेवढी झळ बसली नव्हती. २0१८ मध्ये मात्र शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले. ७५.0६ टक्के पर्जन्यमान झाले. २0१९ मध्ये सुरूवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर मध्यंतरी ओढ दिली. मात्र ऐन हंगामाची काढणी करतानाच जोरदार बरसलेल्या पावसाने पिके पुरात वाहून नेली. अथवा जागीच कोंब फुटले होते. मात्र यावर्षी पर्जन्यमानाचा आकडा १0१.९५ टक्के असा होता. आता यंदा सलग दुसऱ्या वर्षी पर्जन्यमान १00 टक्क्यावर गेले आहे. अजूनही पावसाळ्याचे दिवस संपले नाहीत. मात्र वार्षिक सरासरीच्या तुलनेत पर्जन्याचा आकडा १00 टक्क्यांवर पोहोचला आहे. अजूनही अधून-मधून पावसाची हजेरी सुरूच आहे. 

४.८ मिमी पावसाची नोंद
मंगळवारी पहाटे ८ पूर्वीच्या चोवीस तासांत पडलेल्या पावसाची जिल्ह्याची सरासरी ४.८ मिमी आहे. यामध्ये हिंगोली ३.२ मिमी, कळमनुरी २.८ मिमी, वसमत १३.५ मिमी, औंढा १.९ मिमी तर सेनगावात 0.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात आजपर्यंत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत १११.५ टक्के पर्जन्यमान झाल्याचे दिसत आहे.


मागील सहा वर्षांतील पर्जन्यमानाची टक्केवारी

तालुका    सरासरी पर्जन्य    २0१४    २0१५    २0१६    २0१७    २0१८    २0१९    २0२0
हिंगोली    ९३५.७३    ४३.८३    ८२.९७    ११८.५७    ७८.७१    ७४.८४    १0९.२२    ९९.७
वसमत    ९0२.५0    ३७.४१    ३७.३0    ९८.११    ६३.८७    ६८.६६    ८७.0६    ९७.७
कळमनुरी    ८६१.१८    ४९.६५    ६१.३६    ९५.३९    ५२.५४    ७९.५७    ११३.६६    ९६.६
औंढा ना.    ८0९.८0    ६७.९३    ६३.९९    १२२.५८    ९७.२४    ८६.५३    ९९.८४    १३६.७
सेनगाव    ८२१.७0    ६२.२८    ८१.२0    ९२.४९    ७७.८४    ६६.५५    १0१.४१    ९५.९
एकूण    ८५९.६0    ५२.२२    ६४.२५    १0४.९३    ७३.१८    ७५.0६    १0१.९५    १00.७

 

Web Title: Hingoli district recorded 100% rainfall for the second year in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.