हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन पथक नेमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:42 PM2017-12-16T23:42:26+5:302017-12-16T23:42:31+5:30

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडगूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेणे एक आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.

Hingoli district thunderous; Two teams appointed | हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन पथक नेमली

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन पथक नेमली

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : कुलूप असलेल्या घरांवर नजर; लोखंडी कपाट तोडण्यात चोरटे तरबेज

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडगूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेणे एक आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.
जिल्ह्यात घराफोड्यांचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच निर्माण केले आहे. विशेष म्हणजे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून चोºयांचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर महिन्यात जास्तीत-जास्त चोरीच्या घटना घडल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत चोरीचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. घटनांची संख्या लक्षात घेता पोलिसांना जणू चोरट्यांनी एकाप्रकारे आव्हानच केले आहे. विशेष म्हजणे तपासिक अंमलदाराकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असला तरी, अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. चोºयांच्या घटनांमुळे एखादी परराज्यातील टोळी हिंगोली जिल्ह्यात दाखल तर झाली नाही, असा अंदाज काढला जात आहे. वसमत शहर व कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात जास्तीत जास्त चोºयांच्या घटना घडल्या आहेत. तसेच हिंगोली शहर व ग्रामीण भागातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. घरफोडी करून लोखंडी कपाट तोडण्यात चोरटे तरबेज असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून चोरट्यांचा कसून शोधही घेतला जात आहे. लवकरच चोरटे गजाआड होतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
डिसेंबर महिन्यात सर्वाधिक घडल्या चोरीच्या घटना
कळमनुरी तालुक्यातील बाळापुरातही चोरींचे प्रमाण जास्त आहे. १५ डिसेंबर रोजी भरदिवसा शिक्षक कॉलनीतील एका घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपये नगदी व सोन्याचे दागिने असा २ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. वसमत तालुक्यातील वर्ताळा येथील शेतातून चोरट्यांनी विहिरीतील विद्युत मोटार व इतर साहित्य एकूण २३ हजार ५२० रूपयांची चोरी केली. याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी कुरूंदा ठाण्यात चोरीची नोंद केली. ७ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. वसमत येथील रेल्वेस्थानकावर एकास तलवारीच्या धाकावर लुटले, असून याप्रकरणी १ डिसेंबरला जबरी चोरीचा गुन्हा वसमत शहर ठाण्यात दाखल आहे. हिंगोली शहरातील महसूल कॉलनी येथे घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दािगने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. तर १४ डिसेंबर रोजी वसमत येथील मोंढ्यातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. यासह विविध घटनांच्या नोंदी पोलीस दरबारी दाखल असून तपास सुरू आहे.

Web Title: Hingoli district thunderous; Two teams appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.