हिंगोलीत विभागीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:56 PM2017-12-09T23:56:11+5:302017-12-09T23:56:20+5:30
शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचा ९ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. शनिवारी विजेत्या संघांचा तसेच खेळात सहभागी सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचा ९ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. शनिवारी विजेत्या संघांचा तसेच खेळात सहभागी सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, जि.प. सदस्य सतीश पाचपुते, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, राहुल मदणे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, मुख्याधिकारी रामदास पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, संजय पवार, ओम कोटकर, के. के. शिंदे, संतोष वेरूळकर, जगदाळे, धारणे, प्रशांत बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण केल्यास ते देशपातळीवर नाव उंचावतील, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. जवाहर गाढवे यांनी केले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी बचाटे, बाचा, जाधव, माटे, प्रा. तुळजादास देशपांडे, गणेश कावरखे, शिवाजी सूर्यवंशी, प्रा. तुकाराम मोरे यांच्यासह अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील सर्व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना सुविधा
क्रीडा स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांची राहण्याची, भोजनाची सुविधा करण्यात आली होती. तसेच प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड मागील तीन दिवसांपासून क्रीड स्पर्धेच्या मैदानात तळ ठोकून होते. यावेळी नियोजनबद्ध काम करणाºयांचाही राठोड यांनी सत्कार केला.
सांघिक खेळातील विजयी संघ
कबड्डी स्पर्धा-१४ वयोगटातील मुलांचा विजेता संघ किनवट तर उपविजेता पांढरकवडा, १४ वयोगटातील मुली विजेता संघ धारणी तर उपविजेता औरंगाबाद, १७ वयोगट मुले विजेता संघ धारणी तर उपविजेता औरंगाबाद, १७ वयोगटातील मुलीं धारणी संघ विजेता, तर पांढरकवडा येथील संघ उपविजेता घोषित करण्यात आला. १९ वयोगटातील मुले कळमनुरी संघ विजेता तर धारणी संघ उपविजेता म्हणून घोषित केला. १९ वयोगटातील मुलीमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद संघ. -खो-खो स्पर्धा - १४ वयोगटातील मुले विजेता संघ धारणी तर उपविजेता किनवट संघ ठरला. १४ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता अकोला संघ तर उपविजेता धारणी घोषीत केला. १७ वर्षे वयोगटातील मुले विजेता संघ अकोला तर उपविजेता किनवट संघाने बाजी मारली. १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता संघ अकोला. १९ वर्षे मुलांच्या वयोगटातील विजेता संघ धारणी तर उपविजेता अकोला. १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद. -व्हॉलीबॉल स्पर्धा -१४ वयोगटातील विजेता संघ धारणी तर उपविजेता कळमनुरी. १४ वर्षे वयोगटात मुलींध्ये विजेता धारणी तर उपविजेता पूसद. १७ वर्षे वयोगटातील मुले यामध्ये विजेता संघ धारणी, तर उपविजेता किनवट. १७ वर्षे मुलींच्या वयोगटातून विजेता संघ धारणी तर उपविजेता कळमनुरी. १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद. १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता किनवट. हॅन्डबॉल स्पर्धा -१४ वर्षे वयोगटातील मुले यामध्ये विजेता धारणी तर पांढरकवडा. १४ वर्षे वयोगटात मुलींमध्ये विजेता संघ अकोला तर उपविजेता पांढरकवडा. १७ वयोगट मुले विजेता संघ धारणी उपविजेता अकोला संघ. १७ वयोगट मुली विजेता अकोला तर उपविजेता पांढरकवडा. १९ वर्षे मुले विजेता धारणी तर उपविजेता पांढरकवडा. १९ वयोगट मुली विजेता संघ धारणी तर उपविजेता पांढरकवड आदी संघांनी बाजी मारली. विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.