हिंगोली डॉक्टरांनी पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:48 PM2018-01-02T23:48:46+5:302018-01-02T23:48:59+5:30
राष्ट्रीय आयएमए दिल्लीने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला विरोध दर्शनवून २ जानेवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय आयएमए दिल्लीने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला विरोध दर्शनवून २ जानेवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तसेच जिल्हाधिका-यांना निवेदनही दिले.
हे विधेयक खाजगी व्यवस्थापनांच्या सोयीचे आहे. त्यामुळे भ्रष्टाचार बळावण्याची भीती निवेदनात व्यक्त केली. वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी कोणतीच परवानगी लागणार नाही. तर जागाही ही महाविद्यालये मर्जीप्रमाणे वाढवू शकतात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भीती व्यक्त केली आहे. तर ४0 टक्के जागांवर शासन निर्बंध तर ६0 टक्के जागा महाविद्यालय व्यवस्थापनास राहतील, त्यामुळे शुल्कवाढ होण्याची भीती व्यक्त केली. तर वैद्यकीय शिक्षण महागडे होईल, ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात फक्त ५ राज्यांचे प्रतिनिधीत्व राहील आणि २५ राज्ये दुर्लक्षित राहतील. राज्यांच्या वैद्यकीय परिषदा एनएमसीच्या अधिपत्याखाली राहून त्या अधिकाराविना राहतील. कारण वैद्यकीय व्यावसायिकाची नोंदणीच राष्ट्रीय पातळीवर होईल. या आयोगात प्रत्येक राज्यातील वैद्यकीय विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व राहणार नाही. फक्त सल्लागार राहील. हा निर्णय हुकुमशाही असल्याचा आरोपही केला. यावेळी डॉ.जयदीप देशमुख, डॉ.किशन लखमावार, डॉ.स्नेहल नगरे आदी हजर होते.