हिंगोलीत डॉक्टरांचा एकदिवसीय बंद; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:40 PM2019-06-17T13:40:18+5:302019-06-17T13:41:18+5:30
घटनातील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
हिंगोली : कोलकत्ता येथे डॉक्टरावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने एकदिवशीय बंद पाळण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनही देण्यात आले.
देशभरात डॉक्टरांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा व संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. डॉक्टरांसोबत होत असलेल्या या हिंसाचारी घटनांचा सर्व स्तरांकडून निषेध व्यक्त होत आहे. दुख व्यक्त केले जात आहे. मात्र अशा घटनातील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. कोलकत्ता येथील घटनेतील आरोपींविरूद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी निमाच्या वतीने करण्यात आली आहे. रूग्णालय व तेथे काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी सेंट्रल मेडीकल सेक्युरीटी फोर्स निर्माण व्हावी अशी मागणी केली. निवेदन देताना 'आयएमए'चे अध्यक्ष एस. आर. तापडीया, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. सत्यनारायण सोनी, डॉ. यशवंत पवार, डॉ. किशन लखमावार, डॉ. पातुरकर, डॉ. भगत, डॉ. नगरे, डॉ. उमा सोनी, डॉ. गिते आदी उपस्थित होते.