Earthquake Hingoli: भूकंपाच्या धक्क्याने वडगावच्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:30 AM2024-07-10T11:30:18+5:302024-07-10T11:34:25+5:30

या भागात मागील काही काळापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Hingoli Earthquake: The historic fort of Wadgaon collapsed due to the earthquake | Earthquake Hingoli: भूकंपाच्या धक्क्याने वडगावच्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला

Earthquake Hingoli: भूकंपाच्या धक्क्याने वडगावच्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला

- रमेश कदम
आखाडा बाळापूर ( हिंगोली ):
आज सकाळी तीव्र भूकंपाच्या धक्क्याने पेठ वडगाव येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुजला ढासळला. बुरुजाची मोठी पडझड झाली आहे. ऐतिहासिक किल्ल्याची भूकंपाच्या धक्क्याने झालेली हानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नव्हती.

गेल्या काही वर्षांपासून या भागातील २० ते २५ गावांना सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. प्रारंभी तर प्रशासनाने हा भूकंपच नाही तर भूगर्भातील हालचाली आहेत असे सांगत नागरिकांचे म्हणणे उडवून लावले. आता टप्प्याटप्प्याने भूकंपाची तीव्रता वाढत आहे आणि परीक्षेत्रही वाढले आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आज सकली ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४.५ एवढी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव,रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या भागात आहे. हा भूकंपाचे हादरे मराठवाडाभर जाणवले आहेत. दरम्यान, भूकंपाच्या केंद्रबिंदू जवळ असलेल्या कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील ऐतिहासिक किल्ल्याला याचा मोठा फटका बसला आहे. किल्ल्याचा बुरुज ढासळला असून मोठी पडझड झाली आहे. 

या भागात मागील काही काळापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भूगर्भातून आवाज आला की लगेच नागरिक घराबाहेर पडतात. आजही भूकंपाचे हादरे जाणवताच सर्वंच लोक घराबाहेर आले. चर्चा करत असतानाच गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडून मोठा आवाज आला. मातीचे मोठे लॉट हवेत उठेल. काही वेळाने किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आले. ढासळलेल्या दगडांचा आवाज येताच धुळीचे लोट उठलेले दिसत होते. लागलीच नागरिकांनी याचा व्हिडिओ घेतला. 

पेठ वडगावचा किल्ला अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असल्याच्या नोंदी आहेत. आजच्या भूकंपाने त्या किल्ल्यालाही धक्का बसला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला गेलेले तडे आणि ढासळलेला बुरुज पाहताना वेदना होत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. 

Web Title: Hingoli Earthquake: The historic fort of Wadgaon collapsed due to the earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.