मुस्लिम बांधवांचा हिंगोलीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:54 PM2018-07-06T23:54:18+5:302018-07-06T23:54:34+5:30
उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
उत्तर प्रदेशातील १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली. तर मध्य प्रदेशातील मन्सौर येथेही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. त्यामुळे यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, पीडितांना न्याय देण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना दिले आहे. निवेदनावर मौलाना जुनेद्दूर रहेमान कासमी, मौलाना इजाजबैती, शेख युसूफ मामू,मुफ्ती काजी फहीम, मुफ्ती अब्दुल कदीर, मुफ्ती जियाओद्दीन, मुफ्ती शमी रहेमानी, मौलाना इब्रान, हाफेज अ.बासीद मौ., हाफेज अनिस, मो.साजीद म. खुर्शीद, स.ईस्माईल स.इब्राहिम, शेख सत्तार तांबोली, मो. हनिफ तांबोली, रमेश भिसे पाटील, देवीदास चाटसे, मुनीर पटेल, हाजी निहाल भैय्या आदींच्या सह्या आहेत.