हिंगोलीला पावसाचा तडाखा; शिरड शहापूरजवळ पर्यायी पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 10:09 AM2020-06-14T10:09:17+5:302020-06-14T10:13:54+5:30
पाणी तुंबल्याने आजूबाजूच्या ५० शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे
हिंगोली:जिल्ह्यात सरासरी २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. औंढा तालुक्यातील शिरड शहापूर जवळ पर्यायी पूल वाहून गेला आहे. तर पाणी तुंबल्याने आजूबाजूच्या ५० शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पेरणी खरडून गेली आहे.
वसमत तालुक्यात वगळता इतर चारही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडला. यात हिंगोली तालुक्यात २० मिमी, कळमनुरी १६ मिमी, सेनगाव १७.६७, वसमत १.८६, औंढा तालुक्यात सर्वाधिक ४४.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. औंढा तालुक्यातील शिरड शहापूर जवळ पर्यायी पूल वाहून गेला आहे. तर पाणी तुंबल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. औंढा मंडळात ६२ तर शिरड शहापूर मंडळात ७५ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे नाल्याला पूर आला होता. रस्त्याचे काम झाले असून पूल रखडला आहे. पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी उरला नाही.