हिंगोलीला मुसळधार पावसाचा तडाखा; गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:51 AM2020-06-28T10:51:43+5:302020-06-28T10:53:58+5:30

सेनगाव तालुक्यात ४१ मिमी पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली.

Hingoli hit by torrential rains; The bridge on the Goregaon-Sengaon road was swept away | हिंगोलीला मुसळधार पावसाचा तडाखा; गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

हिंगोलीला मुसळधार पावसाचा तडाखा; गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

googlenewsNext
ठळक मुद्देचोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७.५५ मिमी पाऊस पडला. ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी चांगले पर्जन्यमान झाले. सेनगाव तालुक्यात ४१ मिमी पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील आजेगावनजीकचा पर्यायी पूल वाहून गेल्याने ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे.

रविवारी सकाळी आठपूर्वीच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७.५५ मिमी पाऊस पडला. यामध्ये मंडळनिहाय पडलेला पाऊस असा आहे. हिंगोली तालुक्यात हिंगोली १४ मिमी, खंबाळा ८, माळहिवरा ६, सिरसम बु. ३, बासंबा ७, नरसी नामदेव ९, डिग्रस १४, कळमनुरी तालुक्यात कळमनुरी १९, नांदापूर ३, आखाडाबाळापुर २६, डोंगरकडा १२, वारंगा फाटा १०, वाकोडी २६, सेनगाव तालुक्यात सेनगाव ३०, गोरेगाव ९, आजेगाव ५५, साखरा ९९, पानकनेरगाव ४४, हत्ता ८, वसमत तालुक्यातील तालुक्यातील वसमत ३, गिरगाव १५, कुरुंदा १०, टेंभूर्णी ४, आंबा ५,हयातनगर २९,औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा ९,जवळा बाजार ११, येहळेगाव २४, साळणा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
 


सेनगाव तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव या मंडळात यापूर्वीही अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे कालच्या पावसात सेनगाव तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला होता. यात गोरेगाव ते सेनगाव जाणाऱ्या रस्त्यावर आजेगावनजीक असलेला मोठ्या नाल्यावरील पर्यायी पूलही वाहून गेला आहे. त्यामुळे ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा शेतकरी आधीच दुबार पेरणीचे संकट वारंवार झेलत असून हा पुन्हा एकदा आघात झाला आहे.

Web Title: Hingoli hit by torrential rains; The bridge on the Goregaon-Sengaon road was swept away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.