Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय
By विजय पाटील | Published: June 4, 2024 11:36 AM2024-06-04T11:36:01+5:302024-06-04T11:41:53+5:30
Summary: Hingoli Lok Sabha Result 2024: सुरूवातीला अगदी शंभरच्या आता असलेली लिड आता तीन हजारावर गेली आहे.
Hingoli Lok Sabha Result 2024: हिंगोली लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत काहीसे मागे पडलेले नागेश पाटील आष्टीकर आता तिसऱ्या फेरीत आघाडीवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. आष्टीकरांची लिड ६ हजार ४५२ एवढी झाली आहे.
या फेरीनंतर उद्धव सेनेचे नागेश आष्टीकर यांना ६४ हजार ६१५ मते तर शिंदे सेनेचे ५८ हजार ५५ मते मिळाली आहेत. वंचितचे बी.डी. चव्हाण २५ हजार ८४४ मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सुरूवातीला अगदी शंभरच्या आता असलेली लिड आता तीन हजारावर गेली आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला बदलणारे हे आकडे कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढवत आहेत.
नागेश आष्टीकर : उद्धव ठाकरे शिवसेना
७९ हजार ९७० मते
बाबूराव कदम : शिवसेना
७३ हजार ५१८ मते
बी.डी. चव्हाण : वंचित
३० हजार ८४४ मते
नागेश आष्टीकर यांची लीड ६ हजार ४५२