दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंगोली बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:48 PM2018-10-18T23:48:12+5:302018-10-18T23:48:29+5:30
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे. राज्य-परराज्यातून दसरा महोत्सव पाहण्यासाठी हिंगोलीत अलोट गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे. राज्य-परराज्यातून दसरा महोत्सव पाहण्यासाठी हिंगोलीत अलोट गर्दी झाली होती. झेंडूंच्या फुलांनी बाजार सजला होता. शिवाय दसºयाच्या शुभ मुहुर्तावर विविध वस्तू खरेदी केली जातात. वाहन, इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांसह सोने खरेदीसाठी सराफा मार्केटमध्ये गर्दीचे चित्र होते.
दसरा प्रदर्शनीतील आकाश पाळणे, मौत का कुआँ,यासह विविध मनोरंजनात्मक खेळ व स्टॉलवर बच्चेकंपनीची कुटुंबियांसह गर्दी दिसून आली. दरवर्षीप्रमाणे रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक हिंगोलीत दाखल झाले होते. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा दिसत होत्या. दुर्गा महोत्सव व दसरा सणानिमित्त हिंगोलीत उत्साहाचे वातावरण होते. झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली होती. सणासाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदीसाठी सकाळपासून हिंगोली शहरातील गांधी चौक येथे मोठी गर्दी झाली होती. झेंडूची फुले सकाळी १५ ते २० रूपये किलो दराने विक्री होत होती. दुपारी चारनंतर तर चक्क शेतकºयांनी ५ रूपये किलो कवडीमोल दराने विक्री केली. तर वाहने, सोने खरेदीला थोडाबहुत प्रतिसाद असला तरीही कपडा बाजारात तेवढी गर्दी नव्हती. शहरात चोख पोलीस बंदोबस्त मात्र होता.
खरेदीसाठी दुकानांत गर्दी
४दसºयाच्या शुभ मुहुर्तावर हिंगोली शहरातील सराफा बाजार तसेच ईलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. वाहने खरेदीसाठी यापूर्वीच बुकींग करणाºया ग्राहकांनी दुकानांवर सकाळपासून गर्दी केली होती. तर काही ठिकाणी मात्र ऐनवेळीची गर्दी दिसत होती.
प्रदर्शनीतही उलाढाल
४दसºयाच्या दिवशी ग्रामीण भागातून प्रदर्शनी पाहण्यासह खरेदीसाठी महिला-पुरुष मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यामुळे या दिवशी लाखोंची उलाढाल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच दसरा महोत्सवातील प्रदर्शनी सुरू झाली होती. दुकानांसह झुले, मौत का कुंआ व इतर बाबींना मोठा प्रतिसाद होता.