हिंगोलीच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:52 AM2019-05-23T00:52:22+5:302019-05-23T00:53:43+5:30

लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेतच काट्याची लढत झाली.

Hingoli MP today's decision | हिंगोलीच्या खासदाराचा आज फैसला

हिंगोलीच्या खासदाराचा आज फैसला

Next
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणारकोणाच्या विजयाचा होणार जल्लोष ?सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी

हिंगोली : लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेतच काट्याची लढत झाली. या दोन्हीपैकी एका पक्षाच्या गळ्यात विजयमाला पडणार आहे. २३ रोजी मतमोजणीनंतर तो कोण? हे स्पष्ट होणार आहे. मात्र एक्झिट पोलनंतर राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
हिंगोली लोकसभेचे मतदान १८ एप्रिलला झाले. तेव्हापासून आजपर्यंत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नुसत्या निवडणुकीच्या गप्पा व विजयाची गणिते लावून हैराण आहेत. आता प्रत्यक्ष मतमोजणीची तारीख आली आहे. यात विजयाची गणिते जुळविणारे संदेश पहिल्याच टप्प्यात काँग्रेस, शिवसेना व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून फिरविले जात होते. आता समाज माध्यमांवर कोण जिंकणार आहे, याची चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्ते कळमनुरी, उमरखेड, हदगाव व किनवट या मतदारसंघात मताधिक्य मिळणार असल्याने विजय आमचाच, असे सांगत आहेत. तर शिवसेनेकडून हिंगोली, वसमत, उमरखेड, हदगाव व कळमनुरीतही मताधिक्य मिळेल असे सांगून विजयाची गणिते मांडत आहेत. त्यातच एकमेकांची दुबळी बाजू मांडताना काँग्रेसच्या संथ प्रचाराबाबत तर सेनेतील बंडाळीबाबत चर्चा होत आहे. यातून कुठे मताधिक्य घटले, कुठे मते वाढणार याचे दावे होत आहेत. तर सामाजिक गणितांचा आधार लावत वंचित आघाडीचाही विजय कसा होणार हे सांगितले जात आहे. त्यामुळे जनतेने नेमका कोणाला धक्का दिला ते कळणार आहे.
कडेकोट बंदोबस्त, ४७१ पोलीस तैनात
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी दरम्यान पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच ४७१ पोलीस कर्मचारी तसेच १३ पोलीस निरीक्षक, सपोनि ४३, पोलीस उपअधीक्षक ३ तसेच एसआरपीएफचे १ व सीआपीएचे १ असे दोन प्लाटून कर्तव्य बजावणार आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून तशी पुर्वनियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी शांततामय वातावरण ठेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. २३ रोजी मतमोजणीनंतर कोण विजयी होणार याबाबत जनताही उत्सूक असल्याचे चित्र आहे. शिवाय सगळीकडेच निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अखेर मतपेटीत बंद झालेला कोणता उमेदवार विजयी होणार हे आज कळणार आहे. मतमोजणीच्या दिवशी लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे कडेकोट बंदोबस्त असणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. दरम्यान, प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Web Title: Hingoli MP today's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.