हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे पिकअप पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:34 PM2018-06-28T17:34:19+5:302018-06-28T17:35:25+5:30
शहरात नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पकडला.
हिंगोली : शहरात नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पकडला. यातील दहा जनावरे व पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोनि उदयसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बुधवारी नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पेन्शनपुरा भागात खाकीबाबा चौक येथे एक पिकअप (एमचएच ३८ - एक्स-०३९३) अडविण्यात आला. यात कत्तलखान्याकडे घेऊन जाणारी दहा जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरे व वाहन जप्त केले असून शहर ठाण्यात आणले. पोना ग्यानदेव सखाराम घुगे यांच्या फिर्यादीवरून अशोक प्रकाश इंगोले, अशोक बाबुराव इंगळे, तुळशीराम दगडू लोंढे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एपीआय कल्याणकर, शेख शकील, प्रदीप जाधव, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे आदींनी केली. पुढील तपास पोना वसियोद्दीन करत आहेत.