हिंगोली पोलीस दलातील ६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:06 AM2019-05-30T01:06:49+5:302019-05-30T01:07:26+5:30
विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत.
हिंगोली : विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. यामध्ये सपोउपनि, पोहेकॉ, पोना व पोशि आदींचा समावेश आहे. येत्या काही दिवसांतच पोलीस अधिका-यांच्याही बदल्या होणार आहेत.
मे महिना सुरू होताच अधिकारी व कर्मचाºयांना बदलीची चिंता असते. जून महिन्यात शाळा सुरू होतात, त्यापुर्वी बदली कुठे झाली हे समजण्यास त्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जाते. बदलीमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मोक्याच्या किंवा जवळील पोलीस ठाणे मिळविण्यासाठी सर्वच कर्मचारी प्रयत्न करतात.
महाराष्टÑ पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील तरतुदीनुसार व जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून विहित कालावधी पूर्ण झालेल्या या घटकातील पोलीस कर्मचाºयांना त्यांच्या पसंती, नियम व प्रशासकीय निकड याचा विचार करून जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने त्वरित प्रभावाने बदली नेमणूक करण्यात आली आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस कर्मचारी रुग्ण निवेदन करतील अथवा गैरहजर राहतील त्यांना रुग्ण निवेदनाच्या तारखेपासून स्थित कार्यमुक्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावण्यात येईल. बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीस स्थगिती देणे अशा प्रकारच्या विनंत्यांची या कार्यालयातर्फे दखल घेतली जाणार नाही. बदली झालेले पोलीस कर्मचारी बदली आदेशाचे पालन करून नवीन नेमणूक दिलेल्या ठिकाणी प्रथम हजर होतील व तेथील प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत त्यांची विनंती नव्याने या कार्यालयास सादर करतील. नवीन प्रभारी अधिकारी यांच्या शिफारशीशिवाय विनंतीचा विचार केला जाणार नाही.
हिंगोली ग्रामीण ठाण्यातील सपोउपनि गणेश भोजाजी शिंदे यांची नर्सी नामदेव पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. तर सपोउपनि किशन राजाराम डुकरे यांची सेनगाव ठाण्यातून हिंगोली ग्रामीण येथे तर सपोउपनि पुंजाजी आश्रुबा घोगरे यांची हिंगोली पोलीस मुख्यालयातून सेनगाव येथे बदली झाली आहे.
पोलीस ठाणे कर्मचा-यांना लेखी सूचना
बदली झालेले पोलीस कर्मचारी बदली ठिकाणी हजर न झाल्यास त्यांच्या बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीस स्थगिती देणे अशा विनंतीचा विचार केला जाणार नाही. या संबंधीत पोलीस कर्मचा-यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिका-यांनी त्यांच्या पोस्टेस, शाखेस हजर झालेल्या पोलीस कर्मचारी यांची नावे व त्यांच्या पोस्टे शाखेतून बदली ठिकाणी कार्यमुक्त केलेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे हजर झालेल्या कार्यमुक्त केलेल्या दिनांकासह पोलीस अधीक्षक कार्यालयास कळवावी लागणार आहेत.
बदली आदेशात नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचा-यांना नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यापुर्वी त्यांनी त्यांच्याकडील तपासावरील प्रलंबित सर्व गुन्हे, वरिष्ठ अर्ज, स्थानिक अर्ज आणि इतर सर्व प्रलंबित प्रकरणे प्रभारी अधिकाºयांनी स्वत:कडे घेऊनच कार्यमुक्त करावे, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ठाणे प्रभारी अधिकाºयांची राहणार आहे.