बंजारा समाजातर्फे हिंगोलीत रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:13 AM2017-12-22T00:13:03+5:302017-12-22T00:13:34+5:30

तालुक्यातील आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त वामन जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलाला तहसीलदार व लिपिकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने संजय जाधव यांनीही घरी जावून आत्महत्या केली. त्यामुळे तहसीलदार व लिपीकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु असलेल्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून २१ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील बंजारा समाजातर्फे रास्तारोको करण्यात आला.

Hingoli Rastaroko by Banjara Samaj | बंजारा समाजातर्फे हिंगोलीत रास्तारोको

बंजारा समाजातर्फे हिंगोलीत रास्तारोको

googlenewsNext
ठळक मुद्देउपोषणाचा सातवा दिवस : संजय जाधव यांचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त वामन जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलाला तहसीलदार व लिपिकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने संजय जाधव यांनीही घरी जावून आत्महत्या केली. त्यामुळे तहसीलदार व लिपीकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु असलेल्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून २१ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील बंजारा समाजातर्फे रास्तारोको करण्यात आला.
आंबाळा तांडा येथील शेतकरी वामन जाधव यांनी कर्जबाजारामुळे सन २०१५ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांना मंजूर झालेली शासकीय रक्कम घेण्यासाठी तहसील कार्यालयात संजय जाधव हे त्यांच्या आईच्या उपचारासाठी वामन जाधव यांची ठेव म्हणून ठेवलेली रक्कम मागण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना तहसीलदार व लिपिक यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने संजय जाधव यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आले असल्याने मयत कुटूंबाच्या पत्नीसह, तीन मुली एक मुलगा, सासु व नातेवाईकाने जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केले आहे. अद्याप त्यांच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. शिवसेनेच्या वतीनेही धरणे केले होते. तरीही प्रशासन जागे न झाल्याने २१ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको केला. एवढे करुनही गुन्हा दाखल न झाल्या संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Hingoli Rastaroko by Banjara Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.