हिंगोलीत १ लाख क्विंटल बियाणे प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:41 PM2018-01-08T23:41:55+5:302018-01-08T23:41:59+5:30

जिल्ह्यातील ६ हजार ७५० हेक्टरवर महाबीज मार्फत कार्यक्रम राबविण्यात आला असून, बिजोत्पादनाकडून प्राप्त झालेल्या १ लाख क्विंटलवर प्रकिया सुरु असल्याची माहिती बिजप्रक्रिया केंद्र महाराष्टÑ राज्य बियाणे मंडळाकडून मिळाली आहे.

 Hingoli received 1 lakh quintals of seed | हिंगोलीत १ लाख क्विंटल बियाणे प्राप्त

हिंगोलीत १ लाख क्विंटल बियाणे प्राप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ६ हजार ७५० हेक्टरवर महाबीज मार्फत कार्यक्रम राबविण्यात आला असून, बिजोत्पादनाकडून प्राप्त झालेल्या १ लाख क्विंटलवर प्रकिया सुरु असल्याची माहिती बिजप्रक्रिया केंद्र महाराष्टÑ राज्य बियाणे मंडळाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये महाबीजमार्फत ६ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, उडीद आदी पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. अद्यापपर्यंत बिजोत्पादकाकडून एक लाख क्विंटल कच्चे बियाणे महामंडळास प्राप्त झाले आहे. त्याच्यावर प्रकिया सुरु आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात अनेक बिजोत्पादकांना फायदा होणार आहे. तर २०१८ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर रब्बीमध्ये हरभरा, गहू, ज्वार व करडई या पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम १०८५ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात आला आहे. तसेच रबी हंगामातील गहू बियाणे ग्राम बिजोत्पादन योजनेंतर्गत १९ रुपये प्रतिकिलो दराने महाबीज अधिकृत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी अनुदानावर उपलब्ध आहे. शेतकºयांनी सातबारा व आधारकार्डची झेरॉक्स देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाळी भुईमूगही उपलब्ध
यावर्षी जमिनीची पाणीपातळी चांगल्याप्रकारे असल्याने बरेच शेतकरी उन्हाळी भुईमूगाची पेरणी करतात. त्यामुळे अशा शेतकºयांसाठी भुईमूग एसबी - ११ टॅग- २४ या वाणाचे बियाणे महाबिजकडून विक्रेत्याकडे उपलब्ध करुन दिले आहे. तसेच बीजप्रक्रियेसाठी द्रव स्वरुपातील जैविक खते उपलब्ध करुन दिले आहे. याचा जास्तीत-जास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकातर्फे केले आहे.

Web Title:  Hingoli received 1 lakh quintals of seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.