हिंगोलीत महसूल वसुली १११ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:12 AM2019-04-01T00:12:31+5:302019-04-01T00:12:51+5:30

यंदा मार्चएण्डमध्ये एकतर आचारसंहिता आणि दुसरे म्हणजे निवडणुकीतील सर्वच कामे आलेली असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यात ११ टक्क्यांचा अधिकचा महसूल मिळवून दिला आहे.

 Hingoli revenue revenues at 111 percent | हिंगोलीत महसूल वसुली १११ टक्क्यांवर

हिंगोलीत महसूल वसुली १११ टक्क्यांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा मार्चएण्डमध्ये एकतर आचारसंहिता आणि दुसरे म्हणजे निवडणुकीतील सर्वच कामे आलेली असतानाही प्रशासनाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून त्यात ११ टक्क्यांचा अधिकचा महसूल मिळवून दिला आहे.
हिंगोली जिल्ह्याला यंदा २६.६१ कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. यात जमीन महसुलाचे उद्दिष्ट ५.६१ कोटी रुपयांचे होते. २९ एप्रिलपर्यंत यात ५३९.७३ लाखांची वसुली झाली होती. तर २१ लाख ३0 रोजी वसूल झाले. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करता आले.
गौण खनिज वसुलात मात्र यंदा जिल्ह्याला वाळू घाटांच्या लिलावातून उत्पन्न मिळाले नसतानाही उद्दिष्ट गाठता आले आहे. राष्ट्रीय महामार्गांसह विविध रस्त्यांसाठी गौण खनिजाचा झालेला मोठा वापर उद्दिष्टपूर्तीस फायदेशीर ठरला. यात २१ कोटींचे उद्दिष्ट होते. २९ मार्च अखेरपर्यंत २३.९९ कोटी रुपयांची वसुली झाली होती. ३0 रोजी यात फारशी वाढ झाली नाही. मात्र जिल्ह्याच्या दोन्ही प्रकारच्या महसुलाची २९.६0 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
हे प्रमाण १११ टक्के आहे. त्यामुळे वसुलीत चांगली कामगिरी झाली आहे.
यंदा वाळूच्या लिलावातून काहीच मिळाले नाही. मात्र दंडात्मक कारवाईतूनच दोन कोटींच्या आसपास रक्कम मिळाली. याशिवाय सा.बां.कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून २.९९ कोटी, महाकोषवरील जमा ४.९६ कोटींचाही उद्दिष्ट गाठण्यासाठी फायदा झाला.

Web Title:  Hingoli revenue revenues at 111 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.