हिंगोलीत नर्सी नामदेव, बासंब्याचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:09 PM2020-11-12T15:09:51+5:302020-11-12T15:11:23+5:30
सोडतीचे कार्यालयाबाहेर दूरचित्रवाणी संचावर थेट प्रसारण केले.
हिंगोली : तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत पार पडली. यात तालुक्यातील मोठ्या ग्रा.पं.पैकी नर्सी नामदेव, बासंबा या ठिकाणचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. हिंगोली तालुक्यातील या प्रक्रियेसाठी चोरमारे यांच्यासह तहसीलदार पांडुरंग माचेवाड आदी उपस्थित होते.
सोडतीचे कार्यालयाबाहेर दूरचित्रवाणी संचावर थेट प्रसारण केले. गर्दी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला होता. अनेक गावांतील इच्छुक यावेळी उपस्थित होते. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण १८ गावांचे सरपंचपद राखीव झाले आहे. यात अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी अंभेरी, उमरा, कनका, काळकोंडी, खडकद बु., खांबाळा भांडेगाव, माळधामणी, वैजापूर तर याच प्रवर्गातील महिलेसाठी इडोळी, कडती, कोथळज, खानापूर चित्ता, गिलोरी, जोडतळा, ब्रह्मपुरी, समगा, हनवतखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी ८ ग्रा. पं. सुटल्या आहेत. यापैकी डिग्रसवाणी, देवठाणा, पेडगाव व बोराळवाडी या जमातीच्या सर्वसाधारण तर अंधारवाडी, फाळेगाव, राजुरा व लोहरा या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
इतर मागासप्रवर्गासाठी एकूण ३० ग्रामपंचायती राखीव आहेत. यामध्ये ओबीसी सर्वसाधारणसाठी घोटा, पिंपळखुटा, बळसाेंड, सिरसम बु., मालवाडी, राहोली बु., लिंबळा म., लिंबी, लोहगाव, संतूक पिंपरी, सरकळी, दाटेगाव, आडगाव, जामठी खु., कळमकोंडा बु., तर ओबीसी महिलांसाठी कन्हेरगाव नाका, कलगाव, चोरजवळा, टाकळी त.ना., पिंपळदरी त.बा., भटसावंगी तांडा, माळसेलू, लिंबाळा प्र.वा., सावरगाव बंगला, देऊळगाव रामा, उमरखोजा, हिवरा बेल, दुर्गसावंगी, चिंचाळा, बोराळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी २७ तर याच प्रवर्गातील महिलांसाठी २८ ग्रामपंचायती सुटल्या आहेत. सर्वसाधारणमध्ये आंबाळा, केसापूर, खेर्डा, खेड, गाडीबोरी, जयपूरवाडी, जांभरुण आंध, नर्सी नामदेव, पातोंडा, पहेनी, पांगरी, बासंबा, भिरडा, भिंगी, माळहिवरा, राहोली खु., वरूड गवळी, सावा, साटंबा, हिंगणी, जांभरुण तांडा, इंचा, सवड, दुर्गधामणी, आमला, भोगाव, भटसावंगी या ग्रामपंचायती आहेत. तर महिलांसाठी इसापूर, कानडखेडा बु., कानडखेडा खु., करंजाळा, खंडाळा, खरबी, डिग्रस कऱ्हाळे, चिंचोली, नवलगव्हाण, नांदुरा, पळसोना, पिंपरखेड, पारोळा, बोडखी, बोरजा, बोरीशिकारी, बोंडाळा, लासीना, वडद, वऱ्हाडी, वांझोळा, सावरखेडा, हिरडी, येळी, पारडा, कारवाडी, सागद, बेलुरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.