हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:56 PM2017-12-14T23:56:56+5:302017-12-14T23:57:07+5:30

जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.

Hingoli says, 'Mudra' has 36 million pounds | हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

हिंगोलीत म्हणे, ‘मुद्रा’चे ३६ कोटी वाटले

googlenewsNext
ठळक मुद्देबँका उदासीन : शासकीय योजनांच्या आकड्यांचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मुद्रा योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी, ग्रामीण बँक, खाजगी वित्त संस्थांतर्फे ३० सप्टेंबर २0१७ पर्यंत ११ हजार ५४४ खातेदारांना ३६ कोटी ६४ लाख रुपयाचे वाटप केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली आहे. मात्र यात बँकांनी वेगळे प्रस्ताव बोटावर मोजण्याइतके केले. फक्त नियमित शासन योजनातील लाभार्थीच यात दाखविले जात आहेत.
अडीच वर्षांपासून मुद्रा लोणंतर्गत तीन टप्प्यात विविध बँकेकडून अथवा खाजगी वित्त संस्थांकडून उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यामध्ये नवीन उद्योजकांना तर बँका दारातही उभे राहू देत नसल्याचे वास्तव चित्र आहे. अजूनही नवीन खातेदार बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ३८ कोटी २२ लाख रुपये वितरित झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. यामध्ये शिशु योजनेत २४ कोटी ३६ लाख मंजूर झाले असता, २३ कोटी ३७ लाख वाटप केले, तर किशोरमध्ये मंजूर ८ कोटी ४४ लाख पैकी ८ कोटी १६ लाख वाटप केले आहेत. तर तरुणमध्ये ५ कोटी ४३ लाख मंजूर झाले असता ५ कोटी ११ लाखांचे वाटप केले आहे. असे एकूण ११ हजार ५४४ खातेदारांना तब्बल ३६ कोटी ६४ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात राष्टÑीयीकृत बँकेत १७८ खातेदारांना ६ कोटी ४८ लाख, इतर राष्टÑीयीकृत बँकेत २२० खातेदारांना ३ कोटी ९४ लाख, खाजगी व्यापारी बँकांत १४८ खातेदारांना ४ लाख, तर ग्रामीण बँकेत २६६ खातेदारांना ३ कोटी ६८ लाख, खाजगी वित्त संस्थांकडून १० हजार ७३२ खातेदारांना २२ कोटी १५ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही येत्या मार्च महिन्यांपर्यंत प्रत्येक बँकेत खातेदारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. मात्र मंजुरीचे आकडे जरी मोठ- मोठे असले तरीही मात्र नवउद्योगांची संख्या नगण्यच आहे. शिवाय यात विविध शासकीय योजनांचे एकत्रिकरण करून तेच प्रस्ताव दाखविले जात आहेत. त्यामुळे त्यांचे उद्योग उभारणीचे स्वप्न ते स्वप्नच राहत असल्याचे चित्र आहे.
माहितीही मिळेना : लाभार्थीही हैराण
मुद्रा लोण योजना उद्योजकांच्या दृष्टीने चांगली असली तरीही गरजवंत लाभार्थ्यांना या योजनेचा पाहिजे तसा फायदा होत नाही. शिशु योजनेत लाभार्थ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतरही त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. तर बँक अधिकाºयासोबत लागेबांधे असल्याशिवाय कर्ज मंजूर होत नसल्याची ओरड लाभार्थ्यांतून होत आहे. तसेच अग्रणी बँक व्यवस्थापकही माहिती देताना काळजी घेत असून, कामाचा जास्त ताण असल्याचे सांगत माहिती देण्यासाठी टाळण्याचाच प्रयतन होत आहे. त्यामुळे बँकनिहाय स्थितीच कळत नाही.

Web Title: Hingoli says, 'Mudra' has 36 million pounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.