हिंगोलीत टंचाई; ८0 टक्के गावांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:19 AM2018-03-13T00:19:30+5:302018-03-13T00:19:33+5:30

संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.

 Hingoli shortage; 80 percent of villages survey | हिंगोलीत टंचाई; ८0 टक्के गावांचे सर्वेक्षण

हिंगोलीत टंचाई; ८0 टक्के गावांचे सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात २0१७-१८ या आर्थिक वर्षात पाणीटंचाईवर उपायासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरींसाठी प्रस्तावित केलेल्या ३५९ पैकी २८0 गावांत सर्वेक्षण झाले. यात १९४ गावांत विंधन विहिरीची कामे प्रस्तावित केली आहेत. यात औंढ्यात ४१ गावांतील ५६ योजनांपैकी २४, वसमत तालुक्यात २३ गावांतील ४३ योजनांपैकी २७, हिंगोलीत ८५ गावांतील १0१ योजनांपैकी ३८, कळमनुरीत ४३ गावांतील ७१ योजनांपैकी ३७, सेनगावातील ८८ गावांतील १५१ योजनांपैकी ६८ योजनांना नवीन विंधन विहिरी घेणे योग्य असल्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
नळयोजनांच्या दुरुस्तीची ११८ गावे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १0६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये औंढ्यातील १९ पैकी १६ योग्य, वसमतच्या ९ पैकी ३ योग्य, हिंगोलीत २७ पैकी ९ योग्य, कळमनुरीच्या ३२ पैकी २४ योग्य, सेनगावच्या १९ पैकी १0 योजनांची दुरुस्ती करणे योग्य असल्याचा भूवैज्ञानिक कार्यालयाचा अहवाल आहे.
जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांतील सर्वेक्षणाचे १00 टक्के काम २0 मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचे भूवैज्ञानिक विभागाचे सी.डी. चव्हाण यांनी सांगितले.
पाणीपातळी खालावली
जिल्ह्यातील ५0 निरीक्षण विहिरींची २0१८ च्या जानेवारी महिन्यातील पाणीपातळी तत्पूर्वीच्या पाच वर्षांतील पातळीपेक्षा सरासरी तब्बल २.२१ मीटरने खालावली आहे. यात औंढ्याची ५.१८ वरून ५.८१, वसमतला ६.१२ वरून ११.३७, हिंगोलीत ५.७0 वरून ७.५३, कळमनुरीत ४.६७ वरून ६.२0, सेनगावात ५.७४ वरून ७.५७ मीटर खोलीवर गेली आहे.
तात्पुरती पूरक योजनेसाठी २९ गावे प्रस्तावित होती. यापैकी २0 गावांत सर्वेक्षण पूर्ण झाले. यात औंढ्यांत १ सर्वेक्षण झाले. मात्र तो योग्य नाही. वसमत तालुक्यात ४ पैकी १, हिंगोलीत ८ पैकी ४, कळमनुरीत ४ पैकी ४, सेनगावात ३ पैकी एका काम योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आधीच भूवैज्ञानिक कार्यालयाकडे वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक ही दोन पदे रिक्त आहेत. तर जि.प.त सहायक भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिकाचे पद रिक्त आहे. जि.प.च्या एक व जीएसडीएच्या दोन जणांनी हे काम मार्चमध्येच या स्तरावर आणून ठेवले आहे.
दरवर्षीच जिल्हा भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वाहन नाही, मनुष्यबळ नाही म्हणून टंचाईचा सर्व्हे जूनपर्यंत रखडतो. यंदा मात्र तांत्रिक अधिकाºयांची पदे रिक्त असतानाही हे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे, हे विशेष.

Web Title:  Hingoli shortage; 80 percent of villages survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.