हिंगोली तालुक्यातही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:29 AM2018-08-22T00:29:16+5:302018-08-22T00:29:28+5:30

तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.

 Hingoli taluka damages | हिंगोली तालुक्यातही नुकसान

हिंगोली तालुक्यातही नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.
हिंगोली तालुक्यात हिंगोलीसह समगा, हिंगणी, कोथळज, दुर्गधामणी, मालवाडी, चिखलवाडी आदी गावांच्या शेतशिवारात कयाधू नदीचे पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. हिंगोली शहरापर्यंत कयाधूचे पाणी पात्रातून वाहात होते. मात्र पुढे गेल्यानंतर अनेक मोठे ओढे या नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. तरीही या भागातील पाच ते सहा गावांतील शेतशिवारात कमी-अधिक प्रमाणात या पुराचे पाणी घुसले होते.
हिंगोली तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी माजी सभापती दिलीप घुगे यांनी केले. तर औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी परिसरातील गावांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नामदेव कल्याणकर यांनी केली.
पिके उन्मळताहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तर आहेच. सोबत जोमात आलेली पिके सततच्या पावसाने उन्मळून जातात की काय? याची धाकधूकही आहे. जास्त पाऊस व्हावा व धरण भरावीत ही अपेक्षाही आहे. मात्र जादा पावसाने सुगी हातची जावू नये, अशीही प्रार्थना आहे.
वसमत तालुक्यात गेल्या तीन वर्षांत कमी पाऊस व दुष्काळसदृष्य स्थिती अनुभवली आहे. यावर्षी सुगी चांगली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून वरूणराजा पुन्हा परतला. त्यामुळे पिकांवर पडलेला ताण हलका झाला. पिके पुन्हा तरारली. मात्र आता सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फटकाही शेती शेतकऱ्यांला बसत आहे.
सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आसना, उघडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी शेजारील गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भिती आहे.
कौठा, कुरूंदा, किन्होळा आदी गावातील नदी किनाºयांवर असलेल्या शेतकºयांच्या शेती पुरामुळे खरडल्या जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकºयांत धाकधूकही आहे.
येलदरी, सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी या पावसाने वाढत आहे. पाणी वाढत असल्याचा आनंद आहे. धरण भरले तर पुढच्या सुगीसोबत वर्षभराची चिंता संपणार आहे. त्यामुळे धरणाची पाण पातळी वाढत असल्याचा आनंदही आहे. त्यामुळे आनंद व धाकधूक वाढवणारा हा पाऊस ठरत आहे.

Web Title:  Hingoli taluka damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.