हिंगोलीत थर्टीफस्टला १५ तळीरामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:46 PM2018-01-01T23:46:24+5:302018-01-01T23:46:31+5:30
नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन गोंधळ घालणाºया व वाहन चालविणाºयांवर पोलिसांनी सरत्या वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी २० जणांवर गुन्हे दाखल केले. दारू पिऊन सुसाटपणे वाहन चालविणाºया १३ मद्यपी चालक तर गोंधळ घालणारे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अवैधरीत्या दारू विक्री करणाºया ५ जणांविरूद्ध कारवाई पोलिसांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन गोंधळ घालणाºया व वाहन चालविणाºयांवर पोलिसांनी सरत्या वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी २० जणांवर गुन्हे दाखल केले. दारू पिऊन सुसाटपणे वाहन चालविणाºया १३ मद्यपी चालक तर गोंधळ घालणारे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अवैधरीत्या दारू विक्री करणाºया ५ जणांविरूद्ध कारवाई पोलिसांनी केली.
सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून थर्टीफस्टला नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार असा इशाराही देण्यात आला होता. परंतु काही तळीरांनी कायद्याचे उल्लंघन केले. तर काहीजण दारू नशेत वाहन चालविताना आढळुन आले. पेट्रोलिंगमध्ये दोषी आढळून आलेल्यांवर गुन्हे दाखल केले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर रशिद खाँ रहेमतुल्ला खॉ पठाण, जितू रमेश ठाकूर, राजू उत्तमराव अडकिने, रवि रामराव मोहरील, ज्ञानदेव मारोतराव चौरे, अमोल भाऊराव भोकरे, गणेश संतोबा पवार, प्रल्हाद श्रीपती सोळंके, योगेश बंन्सीराव गायकवाड व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २५ वाहनचालकांवार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७ हजार ३०० रूपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली.
अवैध दारूसाठाही केला जप्त
पोलीस प्रशासनाच्या वतीने १२ ठिकाणी कारवाई करून दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर कारवाई केली. हिंगोली शहर, वसमत शहर व ग्रामीण तसेच हट्टा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हिंगोली शहर ठाणे तसेच कुरूंदा व हट्टा येथे पाच ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाºयांवर गुन्हा दाखल केला. आरोपीकडील ४ हजार १४१ रूपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. थर्टीफस्टला एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितले. सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा हातात घेणाºयांची मात्र यावेळी चांगलीच धांदल उडाली होती. यावेळी कोणाचीही गयावया पोलिसांनी केली नाही.