हिंगोलीत आज ‘एमपीएससी’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:59 AM2018-05-13T00:59:14+5:302018-05-13T00:59:14+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा १३ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे.
हिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा १३ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८ उपकेंद्रावरून १ हजार ८७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी परीक्षेसाठीचे ८ परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येणार असून सदर परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग-अ- ३३६, आ. महाविद्यालय भाग-ब- ३१२, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल २४०, शिवाजी महाविद्यालय - १९२, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला -१९२, जि. प. कन्या शाळा -१६८, संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे विद्यालय -१६८, सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय -२४० या आठ केंद्रावरून परीक्षा घेण्यात येणार आहे.