हिंगोलीत दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 18:26 IST2018-07-05T18:25:38+5:302018-07-05T18:26:10+5:30
शहरातील अकोला-बायपास रोडवरील स्मशानभूमि परिसरात आज दुपारी २. १५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला.

हिंगोलीत दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; दोघे गंभीर जखमी
हिंगोली : शहरातील अकोला-बायपास रोडवरील स्मशानभूमि परिसरात आज दुपारी २. १५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला. यात दोघेजण जखमी झाले. जखमींवर नांदेड येथे पुढील उपचार सुरु असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, आज दुपारी शहरातील बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. दोन्ही दुचाकी वेगात असल्याने यातील एका दुचाकीचा चक्काचूर झाला. यात अनिल बापूराव वाघमारे (२२, रा. अंतुलेनगर) व आदिनखॉन पठाण (१६, रा. लिंबाळा ) अशी जखमीची नावे आहेत.
जखमींना लागलीच जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,त्यांना पुढील उपचारासाठी लागलीच नांदेडला हलविण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती १०८ रूग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायतउल्ला खॉन यांनी दिली आहे.