हिंगोलीत रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:30 AM2018-08-12T00:30:05+5:302018-08-12T00:30:33+5:30
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथील घटनेचे पडसाद हिंगोलीत उमटत आहेत. समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य करून त्याचा व्हिडिओ व फोटोही सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी केली. सदर घटनेचा निषेध म्हणून हिंगोली शहरातील नांदेड नाका अग्रसेन चौक येथे ११ आॅगस्ट रोजी आंबेडकरवादी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान जिंदाबाद च्या घोषणा देऊन रास्ता रोको केला.
पोलिसांना दिलेल्या निवेदनावर योगेश नरवाडे, विकी काशीदे, प्रकाश इंगोले, किरण घोंगडे, मिलिंद उबाळे, अमित कळासरे, स्वप्नील इंगळे, प्रकाश मगरे, विकी खंदारे, आनंद धुळे, सुजय देशमुख, बंडू नरवाडे प्रवीण पाईकराव, दीपक केळे, रवी कांबळे, प्रकाश पठाडे, मयूर नरवाडे, बबलू धाबे, राष्टÑपाल आठवले, पवन कुरील, आकाश काळे, शिवनंदाबाई धांडे, चंदाबाई सोनवणे, उषा इंगोले, मीराबाई दिपके, विमल खिल्लारे, गयाबाई खिल्लारे, शांताबाई भोयर, जानकाबाई इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.