हिंगोली जिल्हा परिषदेच्या ४ सभापती पदासाठी १२ नामनिर्देशनपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:14 PM2020-01-14T13:14:00+5:302020-01-14T13:16:07+5:30

जिल्हा परिषद सभापती पदासाठी अनेकांची इच्छा

In Hingoli Zilla Parishad : 12 nomination papers for the post of 4 chairman | हिंगोली जिल्हा परिषदेच्या ४ सभापती पदासाठी १२ नामनिर्देशनपत्रे दाखल

हिंगोली जिल्हा परिषदेच्या ४ सभापती पदासाठी १२ नामनिर्देशनपत्रे दाखल

Next
ठळक मुद्देदुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची मंगळवारी ( दि.१४ ) निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी अतूल चौरमारे यांच्या उपस्थितीत सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यावेळी ४ सभापती पदासाठी एकूण १२ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली असल्याची माहिती आहे. 

यामध्ये महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी रूपाली ताई पाटील गोरेगावकर, सिंधुताई झटे, सुमनताई जाधव यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. समाजकल्याण सभापती पदासाठी डॉ. सतिश पाचपुते, फकिरा मुंडे, बाजीराव जमडे या तिघांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. इतर दोन सभापती पदासाठी यशोदाताई संजयराव दराडे, कैलाश सांळूखे, अंकुश आहेर, वैष्णवाताई घुगे, बाजीराव जुमडे, रत्नमालाताई चव्हाण यांनी एकूण सहा नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत. 

दरम्यान, भाजपकडून एकही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन, शिवसेनेकडून पाच तर कॉंग्रेसकडून पाच नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतूल चौरमारे यांनी दिली आहे.

Web Title: In Hingoli Zilla Parishad : 12 nomination papers for the post of 4 chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.