हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:31 AM2018-02-08T00:31:25+5:302018-02-08T00:31:32+5:30
नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.
जि.प.त एकूण १५ पैकी ८ विभागात प्रमुख अधिकाºयांचेच पद रिक्त असल्याने प्रभारी अधिका-यांवर सोपविला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच अधून मधून सुरु असलेल्या बैठकीने तर प्रभारी अधिका-यांसह कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त राहतात. त्यामुळे इतर शासकीय कामे रेंगाळत असल्याचे चित्र आहे. आजघडीला ८ विभागाचा पदभार प्रभारीवर आहे. यामध्ये अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्याकडे जिल्हा ग्रामणीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद , सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छताचा अतिरिक्त पदभार आहे. तर हिंगोली तालुक्याचे गणेश वाघ यांच्याकडे महिला व बालकल्याणचा उपमुकाअ पदाचा पदभार आहे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोेले यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधील गीता गुठ्ठे यांच्याकडे समाजकल्याण अधिकारी, ग्रामीण पाठीपुरवठा विभागाचे कळमनुरीचे उपअभियंता सोमनाथ भागानगरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, सेनगावावत सहायक बीडीओ बी. जी. पंडित यांच्याकडेच बीडीओचा पदभार आहे. औंढ्याचे बीडीओ डॉ. सुधिर ठोंबरे यांना वसमतचा अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यांना आपले मूळ कामकाज सांभाळत सांभाळत पदभार असलेल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळावे लागत असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.
शासन उदासीन : वारंवार पाठपुरावा
जि.प.ला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण हटायला तयार नाही. याबाबत शासनास अनेकदा अहवाल पाठवूनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जि.प.तील रिक्त पदे भरण्यासाठी शासन तर उदासीन आहे. शिवाय पुढारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे येथील प्रभारी अधिकारी कार्यालयाचे कामकाज आटोपता आटोपता स्त:हून भांबावून गेल्यागत झाले आहेत. एवढी नामांकित जिल्हा परिषदेचे जर रिक्त पदे भरली जात नसतील तर इतर विभागाची परिस्थती विचारण्याची गरजच नाही. तेथे तर अधिका-यांची वानवा आहे.