हिंगोलीत आंदोलने सुरूच, सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:34 AM2017-12-20T00:34:10+5:302017-12-20T00:34:17+5:30

येथील जिल्हा कचेरीसमोर टाकळी येथील काही शेतकºयांचे धरणे तर आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेने आज या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केले.

Hingoliite agitation stops, stop the way | हिंगोलीत आंदोलने सुरूच, सेनेचा रास्ता रोको

हिंगोलीत आंदोलने सुरूच, सेनेचा रास्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देदखल नाही : चार ते पाच दिवसांपासून आंदोलनकर्त्यांचे ठाण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा कचेरीसमोर टाकळी येथील काही शेतकºयांचे धरणे तर आंबाळा तांडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेने आज या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केले.
आंबाळा तांडा येथील वंदना जाधव या पती संजय जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदार व लिपिकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसल्या आहेत. तर या प्रकरणात शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाकडून हालचाल सुरू झाली. मात्र नंतर ती मंदावत गेली.
टाकळीतर्फे नांदापूर येथील सोनाजी पाईकराव हे ओढ्यामुळे शेतातील पीक खरडून गेल्यामुळे विहीर बुजली, पिके खरडली मात्र नुकसानीचा पंचनामा न झाल्यामुळे भरपाई मिळत नसल्याचा आरोप करून धरणे देत आहेत. तर एसबीआय लाईफ इन्शुरन्सची विमा रक्कम ८0 शेतकºयांच्या पीककर्ज खात्यात जमा न झाल्यानेही टाकळी येथीलच काहीजण धरणे देत आहेत. तर शेतकºयांच्या मालाला भाव द्या, पेन्शन लागू करा, बिगरव्याजी कर्जपुरवठा करा आदी मागण्यांसाठी टाकळीचे मुंजाराव बेंगाळ हे धरणे देत आहेत.

Web Title: Hingoliite agitation stops, stop the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.