हिंगोलीकरांची चिंता वाढली ; आणखी तीन एसआरपीएफ जवानांसह एकजण पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:05 AM2020-04-30T11:05:27+5:302020-04-30T11:11:24+5:30
एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यास रुग्णालयाटतून सुटी देण्यात आली आहे
हिंगोली: येथील एसआरपीएफ जवानांमध्ये कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. आता आणखी तीन जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर जालना येथील जवानाच्या संपर्कातील अन्य एक जण बाधित असल्याचा अहवाल आज आला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे.
हिंगोली येथील 12 जवानांना कालपर्यंत बाधा झाल्याचे समोर आले होते. आज पुन्हा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सेवा बजावत परतलेले आहेत. तर जालना येथील एसआरपीमध्ये कार्यरत मात्र हिंगोली तालुक्यातील हिवरा बेलचा रहिवासी एक जवानही पॉझिटिव आला होता. आता त्याच्या संपर्कातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी त्याचा पुतण्या तर आज अन्य एक पॉझिटिव्ह आला आहे.
याशिवाय वसमत येथील एक व सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील एक बालक कोरोनाबाधित असून एकूण रुग्णसंख्या 21 वर पोहोचली आहे. तर यापूर्वी वसमत येथील एकाला कोणाची लागण झाली होती तो बरा होऊन घरी परतला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली असून रोज नवे रुग्ण समोर येत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी हिंगोली करांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र अनेक भागात नागरिक मॉर्निंग व इव्हनिंग वाकच्या नावाखाली झुंडीने फिरताना दिसत आहेत. या गर्दीला कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. आणखी संसर्ग वाढण्यापूर्वी पोलिसांना दांडुका बाहेर काढावा लागणार असे दिसत आहे.