हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:18 AM2018-01-11T00:18:40+5:302018-01-11T00:22:30+5:30
पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे पालिकेतर्फे सांगितले आहे. यासाठी स्वतंत्र पथकही तयार केले आहे.
पालिकेने शहराच्या विकासावर भर दिला असून, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. शिवाय मोकळ्या जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी केला जात असून, शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस आहे. त्यामुळे पालिकने शहरातील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. तसा तो यापूर्वीही वळविण्यात आला होता. मात्र पालिकेने जरा लक्ष कमी केल्याचा फायदा घेत पुन्हा त्या- त्या जागेमध्ये अतिक्रमण वाढविले होते. त्यानुसार ९ जानेवारी रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले असून, पुन्हा होणारे अतिक्रमण कामयचे हटविण्यासाठी मुंजा बांगर यांचे पथक स्वतंत्र पथक तयार केले आहे.
आता हे पथक अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण काढून ते साहित्य जप्त करणार आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून, जप्त केलेले वापस केले जाणार नाही. संबंधितांनी ते न मागण्याचेही आवाहन पालिकेच्या वतीने केले आहे. तर अतिक्रमण हटविलेल्या जागेचा वापर ‘फूटपाथ’ साठी करत तेथे वृक्षलागवडही केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये कमालीची भर पडणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण न करता पालिकेना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोणाची खैर नाही: अतिक्रमणावर नजर
शहरातील अतिक्रण करणाऱ्यांना अनेकदा सूचना दिल्या आहेत. एवढेच काय तर त्यांना समजावून सांगून काही फरक पडत नसल्याने शहराच्या सौंदर्यासाठी साहित्य जप्तीचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अतिक्रमणात कोणाचीही गय केली जाणार नसून, पालिका शहराच्या सौंदर्यासाठी वाटेल ते करण्यास तयार आहे. तसेच नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि सीओ रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकही स्वत:हून शहराच्या विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.