हिंगोलीत जलेश्वर तलावातील माशांचा अज्ञात कारणाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:56 PM2018-12-28T12:56:05+5:302018-12-28T13:05:43+5:30
तलावात मृत माशांचा थर साचला असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावातील माशांचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
कंत्राटदार सय्यद नईम सय्यद मुसा यांनी या तलावात मासेमारीचे कंत्राट मिळवले आहे. जुलै महिन्यात त्यांनी दोन लाखांचे मत्सबिज तलावात सोडले होते. आतापर्यंत त्यांनी माशेमारीला सुरुवात केली नसून जानेवारी महिन्यात ते मासेमारीला सुरुवात करणार होते. मात्र, अचानक तलावातील माशांचा मृत्यू झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत त्यांनी कोणतीही तक्रार दिली नाही. तहसीलदारांना भेटून पोलिसात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी स.नईम यांनी केली आहे. माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून पालिकेने यावर उपयायोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.